१५८ अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:03+5:302021-02-23T04:13:03+5:30

धरमपेठ झोनअंतर्गत रामनगर चौक ते इंदिरा गांधी रुग्णालय ते अभ्यंकरनगर चौक ते बजाजनगर चौक ते शंकरनगर चौकातील फुटपाथवरील २५ ...

158 encroachments deleted | १५८ अतिक्रमण हटविले

१५८ अतिक्रमण हटविले

धरमपेठ झोनअंतर्गत रामनगर चौक ते इंदिरा गांधी रुग्णालय ते अभ्यंकरनगर चौक ते बजाजनगर चौक ते शंकरनगर चौकातील फुटपाथवरील २५ अतिक्रमणे काढण्यात आली. धंतोली झोनअंतर्गत घाट रोड चौक ते कॉटन मार्केट चौक ते आग्याराम देवी चौकादरम्यान फुटपाथवरील २८ अतिक्रमणे काढण्यात आली. आग्याराम देवी चौक परिसरात बसणाऱ्या मूर्तिकारांचे शेड काढण्यात आले. आसीनगर झोनअंतर्गत अशोकनगर, राम मनोहर लोहिया वाचनालयाजवळील प्रसाद सहारे, कमलाबाई वासनकर यांनी गटारलाइनवर बनविलेली भिंत तोडण्यात आली. त्यानंतर कमाल चौक ते इंदोरा चौक ते टेका चौक ते कपिलनगर चौक दरम्यान फुटपाथवरील ४० अतिक्रमण काढून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. मंगळवारी झोनअंतर्गत गिट्टीखदान चौक ते गोरेवाडा चौक दुर्गानगर पर्यंतच्या फुटपाथवरील ३५ अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान ३७०० रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली.

Web Title: 158 encroachments deleted