शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांसाठी रविनगरमध्ये उभारणार १५ मजली इमारत; सरकारकडून ४३ कोटी रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 18:53 IST

Nagpur : अधिकाऱ्यांच्या निवासाच्या समस्येचे : शहरातील वरिष्ठ निराकरण करण्यासाठी रविनगर परिसरात जी प्लस १५ मजली उंच इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
अधिकाऱ्यांच्या निवासाच्या समस्येचे : शहरातील वरिष्ठ निराकरण करण्यासाठी रविनगर परिसरात जी प्लस १५ मजली उंच इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीसाठी राज्य सरकारने ४३ कोटी ३० लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) असा दावा केला आहे की, पुढील दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जाईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासाची समस्या सोडविण्यासाठी पीडब्ल्यहीने रविनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ५ हजार चौरस मीटर जागेवर उंच इमारत उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. हा प्रस्ताव ६७ कोटी रुपयांचा होता. मात्र, राज्य सरकारने या प्रस्तावात कपात करून ४३ कोटी रुपयांची मंजरी दिली आहे. 

त्यामुळे आता पीडब्ल्यूडीचे अधिकारी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. विभागाच्या मते, हे नवीन अंदाजपत्रक मुख्य अभियंत्यांसमोर सादर केले जाईल. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.

एकूण ३० फ्लॅट्स असतील

राज्य सरकारकडून निधी कमी केल्यामुळे नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था असेल. त्यावरच्या १५ मजल्यांवर प्रत्येकी दोन फ्लॅट्स असतील. यापूर्वी ही इमारत १० मजली असण्याचा प्रस्ताव होता आणि प्रत्येक मजल्यावर तीन फ्लॅट्स ठेवण्याची योजना होती. पीडब्ल्यूडीच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे. येथे आकर्षक लँडस्केपिंग करण्यात येणार असून, इमारत सौर ऊर्जेवर चालविण्याचाही विचार आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : 15-Story Building for Officers in Ravinagar; ₹43 Crore Approved

Web Summary : A G+15 story building for senior officers' residences will be constructed in Ravinagar, Nagpur. The state government has approved ₹43.30 crore for the project. Construction is set to begin within two months after the tendering process. The building will feature 30 flats and solar power.
टॅग्स :nagpurनागपूरGovernmentसरकार