शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:37 IST

राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्दे१,१९,३५५ शेतकरी बाधित : ४६.८५ कोटीचा मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ९६२ हेक्टरवरचे नुकसान हे कापसाचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतीचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ४६ कोटी ८५ लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल ५४ हजार २०२ हेक्टरवरील कापूस, धान, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले. कृषी, महसूल विभागाने पंचनामे केले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून ४६ कोटी ८५ लक्ष ४८ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यानुसार नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांना वितरित केल्यानंतर पुन्हा राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. एकूण ४८ कोटीचा निधी हा तीन टप्प्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई शिल्लक!गत ऑगस्ट व सप्टेंबर या पावसाळ्यांच्या दिवसामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे जिल्ह्यातील २० हजारावरील शेतकऱ्यांच्या ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानभरपाईचा निधी अद्याप राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.

केंद्रीय पथक घेणार विदर्भातील नुकसानीचा आढावा

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीतील शेतपिकांचे नुकसान पाहण्यासाठी पाचही विभागामध्ये केंद्रीय पथक  तीन दिवसीय पाहणी दौरा करून आढावा घेणार आहे.यामध्ये नागपूर आणि अमरावती विभागाचा नुकसान पाहणी दौरा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह हे शुक्रवार २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आढावा घेणार आहेत. हे केंद्रीय पथक विभागातील सर्व जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागास भेट देणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीnagpurनागपूर