शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना १२० खाटांचे आयसीयू बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील १२ दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत हजाराने भर पडत आहे. ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील १२ दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत हजाराने भर पडत आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी मेडिकलमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या ३२६ खाटांपेैकी १५६ खाटा फुल्ल झाल्या आहेत. यातील १२० खाटांच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आग प्रतिबंधक यंत्रणाच नसल्याने दीड महिन्यापासून बंद आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी ५२ खाटा शिल्लक असून आयसीयूचे रुग्ण वाढल्यास त्यांना ठेवणार कुठे, हा प्रश्न आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) केवळ मेडिसीन विभागाचे अतिदक्षता विभाग होते. तत्कालिन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पंतप्रधान आरोग्य सुरक्षेच्या योजनेच्या निधीतून शल्यचिकित्सा विभाग, औषधवैद्यशास्त्र विभाग व बालरोग विभागासाठी स्वतंत्र आयसीयू इमारतीचे बांधकाम हाती घेतले. मार्च २०१८ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. परंतु येथील वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी दोन वर्षे वाट पहावी लागली. १२० खाटांचे हे आयसीयू रुग्णसेवेत सुरू होणार तोच मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. ट्रॉमा केअर सेंटरला कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यात आले. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होताच ‘ट्रॉमा’ला लिक्वीड ऑक्सिजनच्या पाईपलाईनशी जोडण्यासाठी येथील रुग्ण नव्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु जानेवारी महिन्यात भंडारा जिल्हा रुग्णालयात दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यूचा घटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व रुग्णालयांना फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे केले. नव्या आयसीयूचे फायर ऑडिट झाले नसल्याने रातोरात येथील रुग्ण पुन्हा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करून त्याला कुलूप ठोकले. परंतु आता दोन महिन्यांचा कालावधी होऊनही आयसीयू बंद आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने मेडिकल प्रशासन अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

-फायर ऑडिट झाले, पण निधी नाही

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभागाने नव्या आयसीयू इमारतीचे व ट्रॉमा केअर सेंटरचे मागील महिन्यात ‘फायर ऑडिट’ केले. त्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणेसाठी लागणारा खर्चाचा तपशिल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. साधारण ३ कोटींचा हा खर्च आहे. परंतु अद्यापही निधी न मिळाल्याने आयसीयू बंद ठेवण्यात आले आहे.

-कोरोनाच्या केवळ ५२ खाटा शिल्लक

प्राप्त माहितीनुसार, ट्रॉमा केअर सेंटरमधील तीन ‘आयसीयू’ व दोन ‘एचडीयू’ मिळून कोरोनाच्या रुग्णांसाठी १३४ खाटा आहेत. सध्या येथे ९५ रुग्ण भरती असून ३९ खाटा शिल्लक आहेत. शिवाय, दोन वॉर्ड व पेईंग वॉर्ड मिळून ७२ खाटा असून यातील ५९ खाटांवर रुग्ण आहेत. १३ खाटा शिल्लक आहेत. एकूण २०६ खाटांपैकी १५४ खाटांवर रुग्ण तर केवळ ५२ खाटा रिकाम्या आहेत. नव्या आयसीयूत तातडीने आग प्रतिबंधक यंत्रणा बसविल्यास १२० खाटा सुरू होऊन मेडिकलची मोठी अडचण दूर होण्याची शक्यता आहे.