मास्क न लावणाऱ्या ११९ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:59+5:302021-01-13T04:16:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ११९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ...

119 citizens fined for not wearing masks | मास्क न लावणाऱ्या ११९ नागरिकांना दंड

मास्क न लावणाऱ्या ११९ नागरिकांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ११९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २७,१९३ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ९ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १३, धरमपेठ १९, हनुमाननगर १६, धंतोली ८, नेहरूनगर ६, गांधीबाग ९, सतरंजीपुरा ७, लकडगंज १५, आशीनगर ८, मंगळवारी झोन अंतर्गत १६ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत २१,७२३ नागरिकांकडून १ कोटी ८ लाख ६१ हजार ५०० वसूल करण्यात आले आहेत.

Web Title: 119 citizens fined for not wearing masks