शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
"मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
4
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
5
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
6
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
7
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
8
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
9
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
10
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
11
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
12
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
13
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
14
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
15
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
16
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
17
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
18
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
19
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
20
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
Daily Top 2Weekly Top 5

सेमी इंग्रजीच्या १०० शाळांना मंजुरी

By admin | Updated: May 27, 2014 01:44 IST

पालकांचा कल सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होते आहे. याला आळा घालण्यासाठी शाळा

जिल्हा परिषद : पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न

नागपूर : पालकांचा कल सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होते आहे. याला आळा घालण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजुरी देण्याचे धोरण शिक्षण विभागाने स्वीकारले आहे. त्यानुसार जिल्ह्यात सेमी इंग्रजीच्या १०० शाळांना मंजुरी दिल्याची माहिती शिक्षण सभापती वंदना पाल यांनी सोमवारी दिली. २६ जूनला जि.प.च्या शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे निर्देश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शिक्षण समितीवर शिक्षक संघटनेच्या एका पदाधिकार्‍याची नियुक्ती करावयाची आहे. परंतु जि.प. शिक्षकांच्या विविध संघटना असल्याने ज्या संघटनेचे सर्वाधिक सदस्य असतील, अशा संघटनेच्या पदाधिकार्‍याची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ० ते १० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु आरटीईनुसार सरकारनेच मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे. कमी पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद केल्या तर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार हिरावला जाणार असल्याने यावर फेरविचार व्हावा, असे मत वंदना पाल यांनी व्यक्त केले. हिंगणा येथे जि.प.ची डिफेन्स उच्च प्राथमिक शाळा आहे. हिंदी माध्यमाच्या या शाळेत प्रामुख्याने डवलामेटी परिसरातील विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही शाळा डवलामेटी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय समितीने घेतला. सभेच्या मंजुरीनंतर यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जि.प. शाळांमध्ये संगणक व किमती साहित्य आहे. सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची सदस्यांनी मागणी केली. हा विषय मंजुरीसाठी सभेकडे पाठविण्याची सूचना पाल यांनी केली. बैठकीला शोभा झाडे, सुधाकर ढोणे, शांता कुमरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी सहभागी होते. (प्रतिनिधी)