शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १० कोटींच्या वीजचोऱ्या पकडल्या

By admin | Updated: June 17, 2014 00:46 IST

महावितरणने वीजचोरीविरुद्ध विशेष मोहीम राबवून गत महिनाभरात १० कोटींच्या वीजचोरी पकडल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार महावितरणने गत मे महिन्यात राज्यातील १४ परिमंडलात ही मोहीम राबविली.

नागपूर : महावितरणने वीजचोरीविरुद्ध विशेष मोहीम राबवून गत महिनाभरात १० कोटींच्या वीजचोरी पकडल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार महावितरणने गत मे महिन्यात राज्यातील १४ परिमंडलात ही मोहीम राबविली.
दरम्यान १ हजार ७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. यात १६ लाख २५ हजार ८४० युनिट विजेची चोरी झाली असून, त्याची अनुमानित रक्कम १० कोटी २८ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे. त्यानुसार १ हजार ५६६ वीजचोर ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत सिंगल व थ्री फेजचा वीज पुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा ३ हजार २९२ ग्राहकांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार १ हजार ७ ग्राहकांविरुद्ध कलम १२६ नुसार ५१ ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शिवाय ४१० ग्राहकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले.
तसेच उर्वरित लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महावितरणने दिली. या मोहिमेत सर्वांधिक कल्याण येथे २४४, भांडुप येथे १९३, नागपूर ग्रामीण १८६, अमरावती १६७, नाशिक ११८, पुणे ११०, लातूर ११०, नांदेड ८५, कोल्हापूर ७९, बारामती ७०, रत्नागिरी ७१, जळगाव ६२, औरंगाबाद ४६ आणि नागपूर शहरात २५ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. महावितरणच्या दक्षता व सुरक्षा विभागाचे प्रभारी संचालक शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत महावितरणचे सर्व उपसंचालक, सहायक संचालक व ४२ भरारी पथकांचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)