शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसाचा अर्ज

By admin | Updated: August 26, 2016 17:28 IST

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!अमेरिकेच्या व्हिसासाठी मी किती आधी अर्ज  करायला हवा?- अमेरिकेच्या व्हिसासाठी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा, हे उत्तम! तुमच्या अमेरिका प्रवासाचं नियोजन पक्कं होईपर्यंतही वाट पाहू नये. अमेरिकेत जायचं ठरल्यावर व्हिसाचा अर्ज सर्वात आधी करून ठेवावा. काही प्रकारचे व्हिसा अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जाऊ शकतो. किंवा अर्जदाराकडून त्यांनी सादर केलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती लागू शकते. त्यामुळे वेळेआधीच अर्ज करणं उत्तम! व्हिसा हातात पडल्यानंतरच विमानाची तिकिटं, अमेरिकेतल्या हॉटेलमधली आरक्षणं करावीत.मला कौटुंबिक कारणासाठी तातडीनं अमेरिकेला जायचं आहे, पण व्हिसासाठीच्या मुलाखतीच्या तारखा पुढचे अनेक दिवस उपलब्ध नाहीत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीच्या व्हिसासाठी लवकरची अपॉइण्टमेंट मला मिळू शकते का? - हो, अशी व्यवस्था होऊ शकते. अनेकांना तातडीच्या कारणांमुळे प्रवास करावा लागतो. जिथे प्रवासाची व्यवस्था आधी करणं शक्य नसतं अशी काही कारणं / शक्यता व्हिसाच्या इमर्जन्सी अपॉइण्टमेण्ट्ससाठी ग्राह्य धरल्या जातात. तातडीची वैद्यकीय सेवा, अमेरिकेतल्या नातेवाईकाचं अगर अर्जदार ज्याच्या सेवेत आहे अशा व्यक्तीचं अचानक उद्भवलेलं आजारपण याबरोबरच नातेवाइकाचा मृत्यू, अंतिम विधी अशा कारणांसाठी व्हिसाच्या इमर्जन्सी अपॉइण्टमेण्ट्स मिळू शकतात. 

 http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर Apply for an expedited appointment' या शीर्षकाखाली या प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.मात्र पूर्वनियोजित व्यावसायिक बैठका, परिषदा, पदवीदान सोहळे, लग्नसमारंभ आदि कारणांसाठी ही सुविधा मिळत नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे भारतातल्या अमेरिकन वकिलातींमध्ये असलेले अपुरे मनुष्यबळ. गेल्या पाच वर्षांत अमेरिकन व्हिसासाठीच्या अर्जात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात अमेरिकन वकिलातींनी भारतातील एक लाख व्हिसा अर्जांवर प्रकिया केली आहे. वाढीव मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी भारत सरकारशी नियमित संवाद सुरू आहे. मात्र, या ‘समर सिझन’मध्ये व्हिसा अपॉइण्टमेंटच्या प्रतीक्षा यादीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.अधिक माहितीसाठी वेबसाइट :

 

व्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :