शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

फास

By admin | Updated: April 9, 2016 14:58 IST

‘बालिकावधू’ या लोकप्रिय मालिकेतून लहान वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली प्रत्युषा नंतरची घसरगुंडी रोखू शकली नाही. - प्रत्युषा पहिलीच नव्हे. सिनेमा, टीव्ही, मॉडेलिंग अशा ग्लॅमरस क्षेत्रतलं न पेलणारं यश, न पचवता येणारं अपयश, अस्थिर नाती या सा:या अस्थिरतेने कित्येक तरुण आयुष्यांना आजवर नख लावलं आहे. इतकी जीवघेणी असते का ही दुनिया?

 
- मुलाखती आणि लेखन : मुक्ता चैतन्य
 
झगमगत्या ग्लॅमरमागच्या काळ्या अंधारातली घुसमट अणि त्यातून हिंमतीने तरून जाणा:या वाटा
 
‘बालिकावधू’ या लोकप्रिय मालिकेतून लहान वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली प्रत्युषा नंतरची घसरगुंडी रोखू शकली नाही. - प्रत्युषा पहिलीच नव्हे. सिनेमा, टीव्ही, मॉडेलिंग अशा ग्लॅमरस क्षेत्रतलं न पेलणारं यश, न पचवता येणारं अपयश,  अस्थिर नाती या सा:या अस्थिरतेने कित्येक तरुण आयुष्यांना  आजवर नख लावलं आहे. इतकी जीवघेणी असते का ही दुनिया?
- या सा:यातून निभावून जात यश आणि आनंदाच्या वाटा कशा शोधता येतात हे सांगताहेत 
आजच्या आघाडीच्या तीन अभिनेत्री.
 
 
 
    अमृता
 
 इंडस्ट्रीत मिळणारं ग्लॅमर, अटेन्शन, यश आणि अपयश यावर आपला वैयक्तिक भावनिक प्रवास अवलंबून ठेवणं हा मूर्खपणा आहे, हे ही इंडस्ट्री योग्यवेळी शिकवते. फक्त ‘तो’ धडा घ्यायला तुमचे कान-डोळे-मन उघडं हवं. आणखी एक शत्रू. तुलना. त्यातून येणारी अस्वस्थता. ती जीव घेऊ शकते तुमचा. 
मला अमक्या पार्टीचं बोलावणं नाही- तिला आहे, तिने अमुक एका ब्रॅण्डचा ड्रेस घातलाय, अमुक अमुक छान दिसतेय, तमुक तमुक दुबईत शूटिंग करतेय.. ही साधी माहिती उरत नाही. काळजात घुसणारा मत्सराचा सुरा असू शकतो तो.  
- मत्सर वाटतोच.
पण हे असं वाटणं चुकीचं आहे हे समजून या भावना मॅनेज करणं शिकावं लागतं. पण दुर्दैवाने अनेकींना हे समजत नाही. कणाकणाने असुरक्षितता वाढत जाते आणि एका टप्प्यावर ते ओझं हाताळणं अवघड होऊन बसतं. अशावेळी ‘तू चुकते आहेस’ हे स्पष्टपणो सांगणारे सोबत असावे लागतात. मित्रमैत्रिणी. कुटुंबीय. 
 
    प्रिया
 
सिनेमा, सीरियलच्या माध्यमातून आम्ही जे जग उभं करत असतो ते खोटं आहे, हे सतत स्वत:ला बजावत राहावं लागतं. ख:या जगाचं भान त्या चकचकीत जगासाठी हरवून चालत नाही. माङयासाठी घरातली प्रिया आणि घराबाहेरची प्रिया पूर्णपणो वेगळी आहे. घरात मी एक सामान्य मुलगी, गृहिणी, बायको असते. पब्लिक फिगर असलेली प्रिया मी कधीच घरात घेऊन येत नाही. त्यात गल्लत होऊ देत नाही. ते अटेन्शन, ते कौतुक ते सगळं तेवढय़ापुरतंच आहे. ते म्हणजे तुमचं अख्खं आयुष्य नव्हे, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे असेल कदाचित, पण इथल्या स्पर्धेचं, सतत सर्वाना ‘दिसत’ राहण्याच्या चढाओढीचं माङयावर प्रेशर येत नाही.
    सोनाली
 
काम करून घरी परत आल्यानंतर आपली वाट पाहणार कुणीतरी हवं, अशी माणसं आयुष्यात नसणं ही अत्यंत अवघड आणि क्लेशदायी गोष्ट आहे. यशापयशाचे वेगवान झोत घेऊन येणा:या या क्षेत्रत काम करणा:या तरुण मुला-मुलींना फार गरज असते या आधाराची! मी पुण्याची आहे. पण कामासाठी मुंबईत राहते. माझी आई माङयाबरोबर मुंबईत राहते. माङो वडील येऊन जाऊन असतात. माङो सगळे आर्थिक व्यवहारही तेच सांभाळतात. मी माङया आईवडिलांवर जितका विश्वास ठेवू शकते तेवढा इतर कुणावर ठेवू शकेन का? नाही. - या अस्थिर जगात वावरताना ते दोघं ही माझी सर्वात मोठी स्ट्रेन्ग्थ आहे. नक्कीच!