शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पाच-तीन-दोन : चालून पाहावेत असे 15 सोपे रस्ते…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 06:05 IST

अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण विसरुनच गेलो आहोत.. त्या पुन्हा करुन तर पाहा.. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल..

ठळक मुद्देसतत आनंदी(च) असणं ही एक भ्रामक कल्पना आहे. तो हट्ट बरा नव्हे. उदास, अस्वस्थ वाटत असेल, तर वाटू द्या !! 

(मंथन प्रतिनिधी)

करुन तर पाहा.. 

1. भीतीशी लढा : मनात दडून बसलेल्या भीतीचे दार हिंमतीने उघडले, तर पलीकडे आनंद उभा असतो, असे म्हणतात. जे करावेसे वाटते, करणे गरजेचे असते; पण करायची-सांगायची-बोलायची हिंमत होत नाही अशी एक गोष्ट / कृती निवडा आणि ‘करून पाहा’!2. रोज सात तास : झोप महत्त्वाची ! - हे आपण सारे जणू विसरूनच गेलो आहोत. निवांत झोपेच्या शोधात असाल, तर फक्त एक करा : रोज नेहमीच्या वेळे आधी अर्धा तास बिछान्यावर आडवे व्हा...ही तुमच्यासाठी सुरुवात असू शकते.3. फक्त दहा मिनिटं : ‘स्वत:’साठी काढणं ही वरवर अतिशय सोपी वाटणारी पण कृतीत आणायला सर्वांत कठीण गोष्ट ! ती करून पाहा.4. थोडा वेळ उन्हात : उभे राहा शांत ! आजूबाजूने वाहणारे जग पाहत सकाळचे कोवळे ऊन शरीराला लागू दे, मनात शिरू दे !5. पाच-तीन-दोन : शांत बसा. तुम्हाला ‘दिसतात’ अशा पाच गोष्टी, तुम्ही ‘स्पर्श’ करू शकता अशा तीन गोष्टी, तुम्हाला ‘वास येतो’ अशा दोन गोष्टी यांची एक छोटी यादी करा. हे रोज करा. ‘त्या क्षणा’त जगण्याचा अनुभव हळूहळू सवयीचा होईल.6. कौतुक : स्वत:च स्वत:चं आणि स्वत:पुरतं... करून पाहा !! छान वाटेल ! स्वत:मधल्या चांगल्या गोष्टींचा शोधही लागेल.7. सोडायचा प्रयत्न : एकच वाईट सवय ! सुरुवात सोप्या गोष्टींपासून केल्यास धीर येऊ शकेल. उदा. रोज चारऐवजी दोनच कप चहा !8. एक फोन, एक स्पर्श : जीवलग मित्राला, मैत्रिणीला, आई-बाबांना, जवळच्या कुणाला ! एकच...पण रोज !!9. जोमो : जॉय ऑफ मिसिंग आउटचा अनुभव घेणे ! म्हणजे आधी दिवसातला काही वेळ आणि हळूहळू अख्खा एक दिवस सोशल मीडियाच्या कुठल्याही कट्ट्यावर न फिरकणे. त्याशिवाय आजूबाजूचे आवाज, वास, स्पर्श हे कसे दिसतील तुम्हाला?10. वाईट वाटलं, तर वाटू द्या : सतत आनंदी(च) असणं ही एक भ्रामक कल्पना आहे. तो हट्ट बरा नव्हे. उदास, अस्वस्थ वाटत असेल, तर वाटू द्या !! त्या भावनेचा शहाणा स्वीकार हाच ते सावट दूर करण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो.11. हे खाऊ? की ते खाऊ? किती खाऊ? कधी खाऊ? : या प्रश्नोपनिषदात अडकून तुम्ही साधा खाण्याचा आनंद हरवून बसला आहात का? यातून बाहेर या ! साधा उपाय : शरीराचं ऐका ! आणि तोंडावर ताबा ठेवा. ही एवढी सुरुवात पुरेशी आहे. पुढला रस्ता तुमचा तुम्हाला सरावाने सापडेलच ! !12. डायरी : ही कल्पना जुनी आहे खरी, पण जुनाट नक्की नाही ! रोज काय झालं हे लिहून कुठे तुम्हाला इतिहास लेखनाला मदत करायचीय?- स्वत:च्या आयुष्यात काय व्हायला हवं, इतक्या नोंदी केल्या तरी पुरे !13. गजर - वाजेल तेव्हा ‘स्नूझ’चं बटण दाबून त्याचा आवाज बंद करण्याची सवय लवकर घालवाल तेवढी बरी !14. कचरा : घरात नकोच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात तो नको ! कचरा म्हणजे जुने राग, अपेक्षाभंग, कुणालातरी ‘सुनावण्या’ची खुमखुमी... असं सगळं !15. विचार : त्यांच्यावर तुमचा ताबा नसतो हे मान्य, पण तुमच्या मानेवर बसण्यापासून त्यांना रोखायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? आज नाही, उद्याही नाही, पण कधीतरी जमेलच की!!