ZP Election Results 2026: 12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता? कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आघाडीला जनादेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:34 IST2026-02-09T17:33:31+5:302026-02-09T17:34:43+5:30

ZP Election in Maharashtra 2026: राज्यातील १२ जिल्हा परिषदा निवडणुकीचे निकाल आज (९ फेब्रुवारी) जाहीर झाले. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीप्रमाणेच महायुतीने या निवडणुकींमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महाविकासा आघाडीला या निवडणुकांमध्येही चांगले यश मिळवता आलेले नाही. 

ZP Election Results 2026: Who is in power in the 12 Zilla Parishads? Which alliance has the mandate in which district? | ZP Election Results 2026: 12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता? कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आघाडीला जनादेश?

ZP Election Results 2026: 12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता? कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आघाडीला जनादेश?

ZP Election in Maharashtra Results 2026: राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही काही ठिकाणी यश मिळाले आहे. 

महाविकास आघाडीला जिल्हा परिषदा निवडणुकीतही फार चांगला कामगिरी करता आली नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सांगली महापालिका जिंकली आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठेही मविआतील तीन पक्षाने सत्ता मिळवता आली नाही.  भाजपाने ७, शिंदेसेना ३, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पुणे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली आहे. 

१) सोलापूर जिल्हा परिषद निकाल २०२६ - एकूण जागा ६८

भाजपा - ४२
शिंदेसेना - ७
राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) - ९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 0
काँग्रेस - १
उद्धवसेना - ०
इतर - १

२) पुणे जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ७३ 

भाजपा - १०
शिंदेसेना - ४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४८
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
उद्धवसेना - ६
काँग्रेस  - ०

३) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा - 68

भाजपा - १२
शिंदेसेना - ८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - १५
उद्धवसेना - १
जनसुराज्य - ५
स्वाभिमानी शेतकरी संघटना - १
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – ४

४) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल एकूण जागा ६३

भाजपा - २३
शिंदेसेना - २०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
काँग्रेस - १
उद्धवसेना ९
इतर -५

५) परभणी जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५४

भाजपा - २३
शिंदेसेना - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १४ 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ३ 
उद्धवसेना - ६ 
इतर - ३

६) धाराशिव जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५५

भाजपा -१६
शिंदेसेना - १५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ३ 
उद्धवसेना - ७
इतर - ५

७) लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - १८
शिंदेसेना - १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १२ 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
काँग्रेस - २३
उद्धवसेना - १
इतर - ३

८) रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - ६
शिंदेसेना - २६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- १६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -०
काँग्रेस - ०
उद्धवसेना - ३

९) रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक - एकूण जागा ५६ 

भाजपा - ४
शिंदेसेना -४० 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ० 
उद्धवसेना - ६
इतर - १

१०) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५० 

भाजपा - २७
शिंदेसेना - १४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ०
उद्धवसेना - ३ 
इतर ६

११) सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६५ 

भाजपा - २३
शिंदेसेना - १३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - २२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
काँग्रेस - ०
उद्धवसेना - ०
इतर - ०

१२) सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६१

भाजपा - १७
शिंदेसेना - ६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १७
काँग्रेस - ११
उद्धवसेना - १
इतर - २

Web Title : महाराष्ट्र ZP चुनाव 2026: भाजपा का दबदबा, MVA का संघर्ष जारी

Web Summary : महाराष्ट्र ZP चुनावों में, भाजपा 12 जिला परिषदों में प्रमुख शक्ति बनकर उभरी। शिंदे सेना और राकांपा (अजित पवार) ने कुछ जीत हासिल की, लेकिन महा विकास अघाड़ी को संघर्ष करना पड़ा, राकांपा (शरद पवार) ने केवल सांगली नगर निगम जीता। भाजपा ने बहुमत सीटें हासिल की।

Web Title : Maharashtra ZP Elections 2026: BJP Dominates, MVA Struggles in Council Polls

Web Summary : In Maharashtra's ZP elections, BJP emerged as the dominant force across 12 Zilla Parishads. While the Shinde Sena and NCP (Ajit Pawar) secured some wins, the Maha Vikas Aghadi struggled, with NCP (Sharad Pawar) winning only Sangli Municipal Corporation. BJP secured majority seats.