शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘झेड प्लस’, ‘वाय’, सुरक्षा आता मुख्य सचिव ठरविणार

By admin | Updated: November 18, 2014 02:48 IST

महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ किंवा ‘वाय’ सुरक्षा देण्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडील अधिकार आता मुख्य सचिवांना असतील

मुंबई : महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ किंवा ‘वाय’ सुरक्षा देण्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडील अधिकार आता मुख्य सचिवांना असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यासंदर्भात निर्णय घेतला. विविध राजकीय व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ आणि ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविली जाते. मोठा फौजफाटा असलेल्या या श्रेणीतील सुरक्षेच्या वर्गवारीचा अधिकार आतापर्यंत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडेच होता. सुरक्षेच्या तुलनेत ‘स्टेटस सिंबॉल’ या अर्थाने महत्त्व असलेली ‘झेड प्लस’ किंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा मिळविण्यासाठी अनेक राजकारणी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करायचे. संंबधित परंपरागत पद्धतीला फाटा देताना कुणाच्या जिविताला किती धोका आहे हे निश्चित करणे ही बाब पूर्णत: तांत्रिक आहे. धोक्याची पातळी निश्चित करणे व त्यानुसार आवश्यक श्रेणीची सुरक्षा पुरविणे हा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी वापरावयाचा अधिकार नाही. त्याचा निर्णय सक्षम प्रशासनानेच घ्यायला हवा, असे मत फडणवीस यांनी हा निर्णय घेताना नोंदविले. पोलीस महासंचालक व इंटेलिजन्सचे आयुक्त हे समितीचे सदस्य असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. (विशेष प्रतिनिधी)