शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली

By admin | Updated: June 28, 2014 23:11 IST

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे;

बंडगार्डन : ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे; पण काही घटकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रय} सुरू आहेत. समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. जनता हिंसेच्या विरोधात आहे. कायद्याचे राज्य असलेच पाहिजे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष, खासदार हुसेन दलवाई यांनी 
केले. 
हिंसाचाराला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने खर्डा-अहमदनगर येथून खासदार दलवाई यांच्या नेतृत्वाखाली हिंसाचारविरोधी निर्धार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे शनिवारी सायंकाळी पुण्यात आगमन झाले. रेल्वे स्टेशनसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी दलवाई बोलत होते.
आमदार मोहन जोशी, पुणो शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कै. बा. स. ढोले-पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष लक्ष्मी घोडके, नगरसेविका लता राजगुरू, हाजी नदाफ, शंकर राठोड, सुनील मलके, सुरेश राठोड, विनय माळी, अनिल आहेर, नीलेश घाग, नरेंद्र व्यवहारे, सुनंदा घरडे, नाटय़ परिषदेच्या पुणो शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, खलील देशमुख, सुशीला मोराळे आदी  उपस्थित होते. रॅलीचा समारोप हडपसर येथील साधना विद्यालयाच्या प्रांगणात झाला. (वार्ताहर)
 
देशघातक इरादे स्पष्ट
4स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू-मुस्लिम ऐक्य कमजोर करून खेडय़ा-पाडय़ात विषमतेने गांजलेल्या लोकांवर अन्याय करणा:यांना पाठीशी घालण्याचे विघातक उद्योग धर्माध शक्तींनी सातत्याने चालू ठेवले आहेत. खर्डा येथे नितीन आगे आणि हडपसर पुणो येथे संगणक तज्ज्ञ मोहसीन शेख यांच्या प्रतिगामी शक्तींकडून झालेल्या हत्येमुळे संबंधित मंडळींचे शांतताविरोधी व देशघातक इरादे स्पष्ट झाले आहेत, असे दलवाई म्हणाले.