ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. 14 - सायन - पनवेल महामार्गावर खारघरजवळील कोपरा खाडीमध्ये निर्माल्य टाकत असताना अभिजीत काचरेकर हा तरूण वाहून गेला आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}कामोटे येथील सेक्टर नऊ मधील माऊली सोसायटीमध्ये राहणारा अभिजीत काचरेकर हा तरुण आपल्या वडिलांसोबत निर्माल्य पाण्यात टाकण्यासाठी गेला असता कोपरा खाडीच्या पुलावरुन तोल गेल्याने पाण्यात पडला. ही घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तरुणाच्या वडिलांनी १०० नंबरला कॉल करुन कंट्रोल रुमला कळविले. त्यानंतर कंट्रोल रुमवरुन याविषयी माहिती समजताच पनवेल व सिडकोच्या अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तरूणाचा शोध अद्याप सुरु आहे.