शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

येऊरचा विवेकानंद बालआश्रम संकटात

By admin | Updated: August 13, 2014 03:07 IST

महिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे.

नामदेव पाषाणकर, घोडबंदरमहिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे. आश्रमाच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने नको ती कारणे दाखूवन तो बंद करण्याचा घाट काही कथीत राजकारण्यांनी प्रशासनास हाताशी धरून रचला असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे आश्रमात शिक्षण घेणा-या ६५ विद्यार्थ्यांवर बेघर होेण्याची नामुष्की ओढवली आहे.निसर्गरम्य येऊर परिसरात ३२ वर्षापासून सदर आश्रम आर्थिक दुर्बल घटक विभक्त कुटुंब, आईवडिल नसलेले किंवा दोन्हीपैकी एक मयत असलेल्या कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलांसाठी वरदान ठरला आहे़ या आश्रमाच्या आवारात मंदिर, गोशाळा असल्यामुळे धार्मिक वातावरणात ही मुले आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आश्रम संस्था अनुदानित असली तरी आतापर्यंत शासनाकडून मात्र याला अद्याप अनुदान मिळालेले नसल्याचे विश्वस्तांचे म्हणने आहे. दानशूर लोकांनी दिलेल्या मदतीवर हा आश्रम सुरू आहे.आश्रमाची जागा केंद्र सरकारकडून ४० वर्षांच्या भाडेकरारावर घेण्यात आली आहे. ६ ते १८ वयोगटातील ६५ मुले गतवर्षापर्यंत येथे आश्रयाला होती़ मात्र, एप्रिलमध्ये आश्रमाची मान्यता रद्द केल्याचे पत्र संस्थेला मिळताच खळबळ उडाली होती. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व मुलांना नाईलाजास्तव आश्रम सोडून जावे लागले होते. मुलांना मळकट कपडे, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि खेळाचे मैदान नसल्याचा ठपका ठेवून आश्रमाची मान्यता रद्द करण्यात आली. आश्रमाची मान्यता रद्द केली असताना तेथे जर मुले असतील ते कृत्य बेकायदा आहे. तसेच आश्रम संदर्भात मंत्री महोदयांनी विभागीय उपायुक्त कोकण विभाग, उपायुक्त बालविकास आयुक्तालयच, पुणे व उपमुख्य अधिकारी यांना १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले असल्याचे ठाण्याचे महिला व बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.