योगाचार्य अय्यंगार यांचे पुण्यात निधन

By Admin | Updated: August 21, 2014 02:16 IST2014-08-21T02:16:38+5:302014-08-21T02:16:38+5:30

योगसाधनेच्या चैतन्ययज्ञात संपूर्ण जीवन वाहिलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगाचार्य बेलूर कृष्णामाचार सुंदरराज (बी. के. एस.) अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Yogacharya Ayyangar passed away in Pune | योगाचार्य अय्यंगार यांचे पुण्यात निधन

योगाचार्य अय्यंगार यांचे पुण्यात निधन

पुणो : योगसाधनेच्या चैतन्ययज्ञात संपूर्ण जीवन वाहिलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगाचार्य बेलूर कृष्णामाचार सुंदरराज (बी. के. एस.) अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 96 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रसही होत असल्याने त्यांची प्रकृती एकदम खालावली होती. बुधवारी पहाटे 3.3क्च्या सुमारास रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पुण्यासह परदेशातील शिष्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दुपारी 2.3क् च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत वैदिक पद्धतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title: Yogacharya Ayyangar passed away in Pune