शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

होय, मीच हत्या केली!

By admin | Updated: September 4, 2015 01:29 IST

होय, शीनाची हत्या मीच केली. मीच तिच्या हत्येसाठीचा कट आखला. मीच या हत्याकांडाची सूत्रधार आहे, अशी स्पष्ट कबुली अखेर इंद्राणी मुखर्जीने खार पोलिसांना दिली.

मुंबई : होय, शीनाची हत्या मीच केली. मीच तिच्या हत्येसाठीचा कट आखला. मीच या हत्याकांडाची सूत्रधार आहे, अशी स्पष्ट कबुली अखेर इंद्राणी मुखर्जीने खार पोलिसांना दिली. अटकेनंतर तब्बल ११ दिवस खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारियांपासून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंद्राणीकडे कसून चौकशी केली होती. त्यात तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र काल पती पीटर मुखर्जी यांच्यासमोर केलेल्या चौकशीत इंद्राणीने अखेर तोंड उघडलेच.शीनाची हत्या कशी करायची, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी व कुठे लावायची याचाही बेत इंद्राणीनेच आखला होता. हत्येआधी एका पार्टीसाठी पेणमधील फार्महाउसवर जाणे झाले. प्रवासात गागोदे खिंडीतील निर्जन जंगल नजरेस पडले. तिथेच शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला, असेही इंद्राणीने सांगितले. २३ एप्रिल २०१२ रोजी दुसरा पती संजय खन्ना याच्या मदतीने इंद्राणीने गळा आवळून पोटची मुलगी असलेल्या शीनाची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांनी तिचा मृतदेह गागोदे खिंडीत जाळला व पुरला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून भाड्याने घेतलेल्या ओपेल कोर्सा या कारमध्ये मागील सीटवर शीनाचा मृतदेह मध्ये ठेवून इंद्राणी व संजय कडेला बसले. ही कार अन्य आरोपी श्याम राय चालवत होता.इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यांच्याकडील चौकशीचा सिलसिला गुरूवारीही सुरू राहिला. बुधवारी खार पोलिसांनी पीटर यांची तब्बल १२ तास कसून चौकशी केली होती. काल व आज दोन्ही दिवस पोलिसांनी अनेकवेळा पीटर आणि इंद्राणी यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. या चौकशीतून बरीच धक्कादायक माहिती समोर आल्याचे कळते.आयएनएक्स वाहिनी विकल्यानंतर मुखर्जी दाम्पत्याला बख्खळ पैसा मिळाला. हा पैसा त्यांनी नातेवाइकांच्या नावे अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवला होता. मुखर्जी दाम्पत्याने एक प्रॉडक्शन हाउस शीनाच्या नावे विकत घेतले होते. या प्रॉडक्शन हाउसवर शीना हक्क सांगू लागली. त्यामुळे इंद्राणीने प्रॉडक्शन हाउस स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. शीनाने मालमत्तेवरला हक्क सोडला नाही, तर तिला रस्त्यातून हटविण्याशिवाय पर्याय नाही, असे इंद्राणीने पीटरला सांगितले. तेव्हा मला पैशांशी मतलब आहे. काय-कसे करायचे ते तू बघून घे, असा दम पीटरने दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली.गुरुवारी पोलिसांनी शीनाच्या नावे प्रॉडक्शन हाउस विकत घेतले होते का, याबाबत पीटर यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीने चौकशीत उघड केलेल्या माहितीची पीटर यांच्याकडे शहानिशा करण्यात आली. दुसरे असे की पोलिसांच्या चौकशीचा रोख पीटर-इंद्राणी मुखर्जी यांच्या मालमत्तेवर होता.