शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे पुनर्वसन करण्यातच गेली यंदाची दिवाळी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 07:11 IST

अतिवृष्टीने तालुक्यातील बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतातील सर्वच पिकांबरोबर शेतातील वस्ती, त्यातील सर्व अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, पशुधन सुद्धा वाहून गेले.

शिवानंद फुलारी    लाेकमत न्यूज नेटवर्कअक्कलकोट : यंदाच्या महापुरात शेती, पशुधन, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य सर्वकाही पाण्यात वाहून गेले.  केवळ माणसं जिवंत राहिली. त्यामुळे यंदाची दिवाळी पुनर्वसन करण्यातच जात असल्याची व्यथा संगोगी (ब.) येथील पूरग्रस्त शेतकरी भवनराय बिराजदार हे सांगत होते.

अतिवृष्टीने तालुक्यातील बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतातील सर्वच पिकांबरोबर शेतातील वस्ती, त्यातील सर्व अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, पशुधन सुद्धा वाहून गेले.  केवळ माणसं जिवंत राहिली आहेत. जगण्यासाठी काहीच शिल्लक नाही. आता नव्याने संसार थाटण्याचे काम सुरू आहे. 

भवनराय बिराजदार यांच्या शेताजवळील  नदीकाठचा पाटबंधारा वाहून गेला. मध्यरात्री अचानकपणे वस्तीला पाण्याने वेढा दिल्याने धान्य, संसारोपयाेगी साहित्य पाण्यात वाहून गेले. जीवनासाठी मुख्य आधार असलेल्या ४ एकर क्षेत्रातील उभी पिके आणि पशुधनसुद्धा शिल्लक राहिले नाही. महापुराच्या तडाख्याने आमचा संसार रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, अशी भावना त्यांनी व्यक्त    केली. त्यामुळे यंदा कसली दिवाळी आणि कसला फराळ काहीच केले नाही. हातउसने काढून पुनर्वसन करण्याच्या कामात कुटुंब गुंतले आहे. 

संसारच उरला नाही तर सण कसा साजरा करणारयंदाच्या महापुरानं जीवनभर कष्टानं उभा केलेला संसार वाहून गेला.  त्यामध्ये पाच पोती ज्वारी, सहा पोती गहू, तांदूळ, डाळ यासह कपडे, अंथरुण-पांघरुण हे सर्व वाहून गेले.  घरात काहीच शिल्लक राहिलं नाही.  आता शेतीचं आणि संसाराचं पुनर्वसन करणं अवघड आहे. त्यामुळे यंदा जिथं संसारच नाही तिथं सण कसा साजरा करणार, असा सवाल उपस्थित करीत दिवाळीला फराळाचं काहीच केलं नाही. शिवाय काही करण्याची इच्छाही नाही, असं शरणव्वाबाई बिराजदार यांनी सांगितलं.  

टॅग्स :floodपूर