शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचा राहुल देतो संगीताचे आॅनलाईन धडे

By admin | Updated: June 20, 2014 01:01 IST

एका वळणावर त्याचे आयुष्य पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा या कठीण प्रसंगी एका डॉक्टरने त्याच्या मनात जगण्याची नवी उमेद जागविली. संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची डोळस दृष्टी

डोळस प्रयत्न : भारतीय संगीत साता समुद्रापारसंतोष अरसोड - यवतमाळएका वळणावर त्याचे आयुष्य पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा या कठीण प्रसंगी एका डॉक्टरने त्याच्या मनात जगण्याची नवी उमेद जागविली. संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची डोळस दृष्टी त्याला लाभली. यवतमाळातून जगभरातील अनेकांना तो आॅनलाईन पद्धतीने संगीताचे धडे देत आहे. डोळसांनाही लाजवेल असे यश प्राप्त केलेल्या या तरुणाची कहाणी प्रेरणादायी आहे.यवतमाळातील बांगरनगरातील राहुल प्रभाकर सातव या ३२ वर्षीय अंध तरुणाने संगीत क्षेत्रात आपले अनोखे कर्तृत्व सिद्ध केले आहे. सामान्यपणे जीवन जगत असताना दहावीत राहुलला अचानक अंधत्व आले. चेन्नई येथील शंकर नेत्रालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. नवी दृष्टी येईल, ही आशा मात्र या नेत्रालयात मावळली. येथील डॉ. लक्ष्मी महेश यांनी राहुलला आता दृष्टी येणार नाही, असे सांगितले तेव्हा आयुष्यात डोळ्यासाठी तो शेवटचाच रडला. स्वत:च्या पायावर उभे राहा, हा डॉ. लक्ष्मी महेश यांचा संदेश त्याने आपल्या मनावर कोरून घेतला. राहुलला लहानपणापासून संगीताची आवड होती. आई मालती यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले होते. तर वडील प्रभाकरराव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत भजन म्हणायचे. हा वारसा घेऊन राहूलने आपल्या डोळ्यांना नवी दृष्टी दिली. यवतमाळातील प्रभाकर चेपे, माधव चेपे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. संगीत विशारद, अलंकार इथपर्यंत राहुलने धडक दिली. अमरावती येथील प्रा. कांबळे यांच्याकडे घरंदाज गायकीचे शिक्षण घेतले. यामुळे राहूलच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पडले. यवतमाळातच स्वरवैभव संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेकांना शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम, कॅसिओ व तबला वादनात त्याने प्रवीण केले.२००९ मध्ये यवतमाळ येथील पंजाबराव देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी राहूलला गायनाची संधी मिळाली. राहुलचे गायन विद्यालयाचे संस्थापक तुषार सायंकार यांनी इंटरनेटच्या माध्यमातून अमेरिकेत ऐकले आणि यामुळे प्रभावित होऊन आॅनलाईन संगीताचे धडे देण्याची संकल्पना पुढे आली. तब्बल सहा महिने राहुलने सायंकार यांना आॅनलाईन संगीत शिकविले. २०१० मध्ये एक वेबसाईड लॉंच करण्यात आली. या माध्यमातून विदेशातील अनेक विद्यार्थी राहुल याच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागले. शिकागो, कॅलिफोर्निया, लॉसएंजिल्स, कटार, जिद्दा, लंडन येथील विद्यार्थ्यांना राहुल आॅनलाईन शास्त्रीय संगीताचे धडे देत आहे. अमेरिकेतील विद्यार्थ्यांना शनिवार, रविवारी, सौदीअरबमधील विद्यार्थ्यांना शुक्रवारी व युकेमधील विद्यार्थ्यांना बुधवार व मंगळवारी आॅनलाईन शास्त्रीय संगीत शिकविल्या जात आहे.शास्त्रीय संगीताचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात, बुद्धीला चालना मिळते. यामुळे विदेशातील लोकंं शास्त्रीय संगीताकडे वळल्याचे राहुलने सांगितले. त्याला हायफाय कीडस् कार्पोरेशन अमेरिकेचे निमंत्रणसुद्धा प्राप्त झाले आहे. यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा सुगंध साता समुद्रापार दरवळणार आहे.