बारावीची पुस्तके 'पीडीएफ' मध्ये उपलब्ध; सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:53 IST2020-04-09T17:51:24+5:302020-04-09T17:53:37+5:30

 गेल्या काही महिन्यांपासून बालभारतीतर्फे बारावीच्या सर्व विषयांची पुस्तके तयार करण्याचे काम सुरू होते बारावीची बदललेल्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्तळावर उपलब्ध

XII books available in PDF; During the holidays, books can be downloaded and studied | बारावीची पुस्तके 'पीडीएफ' मध्ये उपलब्ध; सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार

बारावीची पुस्तके 'पीडीएफ' मध्ये उपलब्ध; सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार

ठळक मुद्देबारावीची अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्तळावर उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळातर्फे (बालभारती )  इयता बारावीची बदललेल्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्तळावर बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीच्या काळात ही पुस्तके डाऊनलोड  करून अभ्यास सुरू करावा,असे आवाहन बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले आहे.
     गेल्या काही महिन्यांपासून बालभारतीतर्फे बारावीच्या सर्व विषयांची पुस्तके तयार करण्याचे काम सुरू होते.मार्च किंवा एप्रिल महिन्यात बारावीची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्याचा बालभारतीचा प्रयत्न होता. मात्र,गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीमुळे नवीन पुस्तके बाजारातून विकत घेणे शक्य नसल्याने बालभारतीने पीडीएफ सवरूपात  उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली होती.त्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेत सर्व पुस्तके पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
बालभारतीची कला शाखेची  पुस्तके मराठी तर विज्ञान शाखेची पुस्तके इंग्रजी भाषेत आहेत. बालभारतीने पुस्तके संकेतस्तळावर उपलब्ध केल्यानंतर त्वरीत ही पुस्तके व्हट्स अँपच्या विविध ग्रुपवर व्हायरल झाल्याचे दिसून आले.
--------
कोरोनामुळे विद्यार्थी आपल्या घरी आहेत.विद्यार्थ्यांना घरबसल्या बालभारतीच्या संकेतस्थळावरून सर्व विषयाची पाठ्यपुस्तके डाऊनलोड करता येतील.त्यामुळे सुट्टीचा कालावधी वाया न घालता विद्यार्थ्यांनी बारावीचा अभ्यास सुरू करावा.-विवेक गोसावी,संचालक बालभारती.

Web Title: XII books available in PDF; During the holidays, books can be downloaded and studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.