शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Video: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान
4
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
5
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
6
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
7
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
8
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
9
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
10
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
11
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
12
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
13
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
14
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
15
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
16
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
17
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
18
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
19
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
20
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या सृष्टीची विश्वविक्रमी झेप

By admin | Updated: August 24, 2014 01:18 IST

डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सडपातळ बांध्याची चिमुकली झटकन काही इंचीच्या बारखालून शरीराची अलगद झेप घेत सहीसलामत बाहेर पडते... तिची ही थक्क करणारी कामगिरी पाहून

लिंबो स्केटिंग लोकमतच्या ‘बेटी बचाव’ मोहिमेचा पुढाकारनागपूर : डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सडपातळ बांध्याची चिमुकली झटकन काही इंचीच्या बारखालून शरीराची अलगद झेप घेत सहीसलामत बाहेर पडते... तिची ही थक्क करणारी कामगिरी पाहून उपस्थितांचे डोळे दीपून जातात... काहींचे डोळेही पाणावतात... टाळ्यांच्या प्रचंड गजरात या चिमुकलीच्या कामगिरीचे कौतुक होते... दहा वर्षांच्या सृष्टी शर्मा हिने शनिवारी नवी यशोगाथा लिहिली. तिने लिंबो स्केटिंगचा १६.५ सेंटीमीटरची नोंद करीत नव्या विश्वविक्रमाकडे यशस्वी झेपही घेतली. सृष्टीचा हा विक्रम ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदला जाणार आहे.लोकमततर्फे सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाच्या माध्यमातून ‘बेटी बचाव’मोहिमेअंतर्गत सृष्टीला प्रतिभा सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. सृष्टी देखील विश्वविक्रमाला गवसणी घालण्याच्या निर्धाराने सज्ज झाली. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यासाठी लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा उपस्थित होते. या विक्रमाची सत्यता तपासण्यासाठी आणि नोंद घेण्यासाठी अधिकारी वर्गानेही हजेरी लावली होती.सृष्टी ज्या बार खालून जाणार होती त्या सर्व ११ बारची उंची तंतोतंत मोजण्यात आली. सोबतीला चार कॅमेरे सज्ज होते. झाशी राणी चौकातील माहेश्वरी भवनमध्ये लोकमत कॅम्प्स क्लब, बालविकास मंच आणि सखी मंच सदस्यांसह शेकडो नागरिकांनी सृष्टीचा विक्रम डोळ्यात साठवून घेतला. या ऐतिहासिक कामगिरीचे प्रत्यक्ष साक्षीदार बनले. खा. दर्डा यांनी सृष्टीला कडेवर घेत शाबासकी दिली.लिंबो स्केटिंग क्रीडा प्रकारात खेळाडू स्केटिंगवर आडव्या बारखालून स्पर्श न करता निघतो. यापूर्वी चेन्नईच्या मॅडविन डेव्हाने जून २०१४ मध्ये नोंदविलेला २३ सेंटिमीटरचा विक्रम मागे टाकण्यासाठी सृष्टीने १९ सेंटीमीटर उंची सहज पार केली. यानंतर १८ सेंटीमीटर, पाठोपाठ १७ सेंटीमीटर आणि लगेचच १६.५ सेंटीमीटरची अतिषय अवघड उंची यशस्वीरित्या पार करताच उपस्थितांच्या आनंदाला उधाण आले. तिची आई शिखा आणि वडील धर्मेंद्र यांनी आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. दहा वर्षांची सृष्टी मॉडर्न स्कूल उमरेडची विद्यार्थिनी आहे. सृष्टीचे वडील वेकोलिच्या उमरेड कार्यालयात वाहनचालक आहेत तर तिची बहिण सिद्धी राष्ट्रीय दर्जाची स्केटर आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)