शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दर्जाचे ‘सीएस’ प्रशिक्षण केंद्र नागपुरात

By admin | Updated: July 23, 2014 00:54 IST

नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने कंपनी सेक्रेटरीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र नागपुरात लवकरच सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

लवकरच स्थापना : आयसीएसआयचे अध्यक्ष श्रीधरन यांची माहितीनागपूर : नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने कंपनी सेक्रेटरीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र नागपुरात लवकरच सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मेट्रो शहरांमधील केंद्रापेक्षा अधिक सरस सोईसुविधा नवीन केंद्रात असतील. जवळपास १०० एकर जागेवर सुरू होणाऱ्या जागेची पाहणी सुरू असल्याची माहिती इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरीज आॅफ इंडियाचे (आयसीएसआय) अध्यक्ष आर. श्रीधरन यांनी आज पत्रपरिषदेत दिली.‘सीएस’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीधरन मंगळवारी नागपुरात आले होते. नैवेद्यम हॉलमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ‘आयसीएसआय’चे सचिव एम.एस. खरे, सचिव विकास खरे आणि नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष प्रदीप चन्ने उपस्थित होते. कंपनी सेक्रेटरी करिअरसाठी उत्तम कोर्सश्रीधरन यांनी सांगितले की, नागपुरातील केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि निवासासह सर्व दर्जेदार सुविधा राहतील. ध्येयनिश्चित करून कोर्सची आखणी केली आहे. चांगल्या व्यावसायिकांची फळी विकसित करणे, रोजगाराच्या संधी वाढवणे, सदस्य संख्या वाढविणे, आर्थिक स्रोत वाढविणे आणि जागतिक पातळीवर संधी मिळवून देणे, याचा समावेश आहे. कंपनी सेक्रेटरी करिअरसाठी उत्तम कोर्स आहे. आयटी आणि मॅनेजमेंटच्या बरोबरीनेच सीएसकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनी सेक्रेटरीची संख्या कमी आहे. भारतात दरवर्षी फार कमी सीएस तयार होतात. सीएस करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी आघाडीवर आहेत. देशातील एकूण सीएसपैकी महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे. कोर्ससंदर्भात श्रीधरन यांनी सांगितले की, दर पाच वर्षांनी सीएसच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येतो. सध्या उद्योगाचे धोरण काय आहे, त्यानुसार या अभ्यासक्रमाची रचना करण्यात येते. आताच्या अभ्यासक्रमात फॉरेक्स मॅनेजमेंटसारख्या विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. मंदीच्या काळात तूट भरून काढण्यासाठी संस्थेने सरकारला सूचना केल्याचे श्रीधरन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इंग्रजी भाषेवर प्रभुत्व वाढवावेग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे वळावे म्हणून वर्षभर करिअर कौन्सिलिंगचे कार्यक्रम घेण्यात येतात. या भागातील विद्यार्थी सीएसमध्ये करिअर करू शकतात, त्यांनी आपले इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवायला हवे.जागतिकीकरणामुळे भारतात मोठमोठ्या कंपन्यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. या कंपन्या चालवण्यासाठी कुशल व्यावसायिकांची गरज लागणार आहे. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी या पदाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हुशार, बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी कंपनी सेक्रेटरीसारख्या आव्हानात्मक करिअरचा विचार करायला हरकत नाही, असे श्रीधरन यांनी स्पष्ट केले. संस्थेची स्थापना १९८० ला झाली. सध्या ३५ हजार सदस्य आणि ४.५ लाख विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरी किंवा व्यवसायाच्या संधीकंपनी सेक्रेटरी हे व्यवस्थापनातील पद आहे. संचालक मंडळाचा सल्लागार, कंपनीअंतर्गत कायदेशीर तज्ज्ञ, कॉर्पोरेट प्लॅनर आदी भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. कंपनीत कायदा अधिकारी, अनुपालन अधिकारी (कम्प्लायन्स), कायदेशीर सल्लागार, कायदा प्रतिनिधी आणि सॉलिसीटर आदी पदांवर काम करता येते. तसेच कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतंत्र व्यवसायही करता येऊ शकतो. परदेशातही या व्यवसायाला मोठ्या संधी आहेत.