शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: July 4, 2016 01:17 IST

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वारज्यातील ईशान्य सृष्टी सोसायटीमध्ये घडली. पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजू विश्वास शिंदे (वय ३८, रा. शिवकल्याण मित्रमंडळाजवळ, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रीतम सुरेश साकरे (वय ३८, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार मार्तंड डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. वारज्यातील ईशान्य सृष्टी सोसायटीचे बांधकाम सुरू आहे. या साईटवर शिंदे यांना साकरे यांनी प्लंबिंगच्या कामावर ठेवले होते. सातव्या मजल्यावर झोल्यावर बसून काम करीत असताना शिंदे यांचा तोल गेला. झोल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी साकरे यांनी कामगारांच्या जीविताबाबतीत हलगर्जीपणा दाखवला. त्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट तसेच सुरक्षा जाळी बसविली नाही. इमारतीच्या उघड्या डक्टवर जाळी बसविणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास उपनिरीक्षक एस. बी. ताथवडे करीत आहेत.