एक्स्प्रेस-वेवर काम सुरू

By Admin | Updated: July 25, 2015 01:27 IST2015-07-25T01:27:21+5:302015-07-25T01:27:21+5:30

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ असलेल्या धोकादायक दरडीमधील सैल झालेले दगड काढण्याचे काम शुक्रवारी दुपारी

Work on Express-Way | एक्स्प्रेस-वेवर काम सुरू

एक्स्प्रेस-वेवर काम सुरू

अमोल पाटील, खालापूर
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ असलेल्या धोकादायक दरडीमधील सैल झालेले दगड काढण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आले. काम सुरू असताना एक्स्प्रेस-वे पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून, वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळविण्यात आली आहे. तरीही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम पूर्ण होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.
शुक्र वारी हे काम सुरू करण्यात आले. काम करण्यासाठी मोठी यंत्रणा लावण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीचे अनेक वरिष्ठ अधिकारी काम सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित आहेत.
काम सुरू असल्यामुळे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक बोरघाट ते खालापूर टोलनाका यादरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. हलकी वाहने खोपोली, शिळफाटामार्गे वळविण्यात आली असून, अवजड वाहतूक मात्र बंद आहे.

Web Title: Work on Express-Way