शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पोटातून ३६ वर्षांनी बाहेर काढला गर्भाचा सांगाडा!

By admin | Updated: August 20, 2014 01:01 IST

येथील एका इस्पितळातील डॉक्टरांच्या तुकडीने ६० वर्षे वयाच्या एका महिलेवर अगदी विरळा म्हणता येईल अशी शस्त्रक्रिया करून गेली ३६ वर्षे तिच्या ओटीपोटात राहिलेला न जन्मलेल्या अर्भकाचा सांगाडा बाहेर काढला!

विरळी शस्त्रक्रिया : नागपूरच्या डॉक्टरांची कामगिरीनागपूर : येथील एका इस्पितळातील डॉक्टरांच्या तुकडीने ६० वर्षे वयाच्या एका महिलेवर अगदी विरळा म्हणता येईल अशी शस्त्रक्रिया करून गेली ३६ वर्षे तिच्या ओटीपोटात राहिलेला न जन्मलेल्या अर्भकाचा सांगाडा बाहेर काढला!ही अदभूत शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव कांताबाई गुणवंत ठाकरे असे असून ती मध्य प्रदेशातील पिपरिया (शिवणी) या गावातील आहे. बाह्यरुग्ण म्हणून उपचारासाठी आलेल्या कांताबाईवर येथील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि लता मंगेशकर इस्पितळातील डॉक्टरांच्या चमुने गेल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया केली. डॉ. बी.एस. गेडाम यांनी या डॉक्टरी पथकाचे नेतृत्त्व केले. इस्पितळाच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. मुर्तझा अख्तर यांनी सांगितले की, कांताबार्इंना वयाच्या २४ व्या वर्षी सन १९७८ मध्ये गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली होती. या गर्भाची पूर्ण वाढ न होता तिचे गर्भारपण अर्ध्यावरच संपुष्टात आले होते. गेल्या ३६ वर्षांत तो गर्भ विरून जाऊन एका ढिसूळ पिशवीत अडकलेला त्याच्या हाडांचा सांगाडा फक्त शिल्लक राहिला होता. शस्त्रक्रिया केली असता गर्भाच्या हाडांचा हा सांगाडा कांताबार्इंचे गर्भाशय, आतडी व मूत्रपिंड यांच्या मधल्या जागेत अडकून या तिन्ही अवयवांना चिकटून बसला असल्याचे आढळून आले. यामुळेच गेले काही महिने या महिलेस ओटीपोटात वेदना होऊन लघवीच्या वेळी त्रास होत होता. कांताबार्इंचा एक बिजांडकोषही जागेवर नसल्याचे डॉक्टरांना आढळले.गेले दोन महिने ओटीपोटात सतत वेदना होत असल्याची तक्रार घेऊन कांताबाई या इस्पितळात बाह्यरुग्ण म्हणून आल्या होत्या. तपासणी केली असता तिच्या ओटीपोटाच्या खालील बाजूस आतमध्ये कसला तरी गोळा असल्याचे जाणवले व कदाचित ती कर्करोगाची गाठ असावी, अशी डॉक्टरांना सुरुवातीस भीती होती. सोनोग्राफी केली असताही ओटीपोटातील अज्ञात गोळयाचे अस्तित्व नक्की झाले. सीटी स्कॅन केला असता हा हा गोळा कसल्यातरी कठीण पण ढिसूळ पदार्थाचा असल्याचे स्पष्ट झाले.गेल्या १४ आॅगस्टला सुमारे चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर कांताबार्इंच्या ओटीपोटातून हाडाच्या सांगाड्याचे हे गाठोडे बाहेर काढले गेले व आता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.(प्रतिनिधी)