रूपालीच्या घरात चोरी करणारी महिला गजाआड

By Admin | Updated: May 2, 2015 10:21 IST2015-05-02T01:31:10+5:302015-05-02T10:21:45+5:30

अभिनेत्री रुपाली गांगुली-वर्माच्या घरातून तब्बल ७१ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने २४ तासांच्या आत गजाआड केले.

The woman who stole a house in Rupali's house | रूपालीच्या घरात चोरी करणारी महिला गजाआड

रूपालीच्या घरात चोरी करणारी महिला गजाआड

मुंबई : अभिनेत्री रुपाली गांगुली-वर्माच्या घरातून तब्बल ७१ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने २४ तासांच्या आत गजाआड केले. उज्वला जाधव(३३) असे आरोपी महिलेचे नाव असून तिने चोरलेला ऐवज मालमत्ता कक्षातर्फे हस्तगत करण्यात आला आहे.
रुपालीच्या घरी तिसऱ्या मोलकरणीची गरज होती. काहीशा घाईतच रुपालीने जाधवला आपल्या घरी कामावर ठेवून घेतले होते. जाधवने अवघ्या काही मिनिटांत रूपालीच्या दोन मोलकरणींसोबत मैत्री केली. त्या दोघींची नजर चुकवून जाधव रूपालीच्या बेडरूममध्ये शिरली आणि एकूण ७१ लाखांचा ऐवज घेऊन ती पसार झाली. काही वेळाने घरी परतलेल्या रूपालीला हा प्रकार लक्षात आला आणि तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान मालमत्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन पाटील यांनी तत्काळ या इमारतीच्या परिसरातील काही सीसीटिव्ही चित्रण ताब्यात घेतले. मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरिक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. एका महिला जाधवला काही दिवसांपुर्वी भेटली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार पथकाने नातेवाईकांना ताब्यात घेत चौकशी केली. नातेवाईकांनी ही जाधव असल्याचे स्पष्ट केले. तसेच तिच्या वाकोल्यातल्या घराचा पत्ताही दिला. लगोलग पथकाने वाकोल्यात छापा मारून जाधवला अटक केली. चौकशीत तिने गुन्हा कबूल केला.

Web Title: The woman who stole a house in Rupali's house