साक्षी, डीएनए अहवालांमुळे फास

By Admin | Updated: May 27, 2014 05:31 IST2014-05-27T05:31:00+5:302014-05-27T05:31:00+5:30

बहुचर्चित इस्थेर अनुह्या हत्याकांडातील आरोपी चंद्रभान सानपविरोधात आज मुंबई गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले.

Witness, FAS due to DNA reports | साक्षी, डीएनए अहवालांमुळे फास

साक्षी, डीएनए अहवालांमुळे फास

मुंबई : बहुचर्चित इस्थेर अनुह्या हत्याकांडातील आरोपी चंद्रभान सानपविरोधात आज मुंबई गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. डीएनए चाचणी अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि अन्य परिस्थितीजन्य पुराव्यांची भक्कम साखळी आरोपी चंद्रभानविरोधात उभी केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे. ५४२ पानी आरोपपत्रात एकूण ७६ साक्षीदारांचे जबाब नोंद आहेत. त्यापैकी काही साक्षीदारांनी घटनेच्या दिवशी पहाटे आरोपी चंद्रभान आणि अनुह्या या दोघांना मोटारसायकलवरून लोकमान्य टिळक टर्मिनन्स परिसरातून बाहेर पडताना पाहिलेले आहे. तसेच हत्येनंतर इस्थेरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी चंद्रभानने ज्या मित्राला मदतीसाठी घटनास्थळी बोलावून घेतले होते त्या तरुणालाही साक्षीदार करण्यात आले आहे. गुन्हे शाखेतल्या एका अधिकार्‍यानुसार हा तरुण या खटल्यातला स्टार साक्षीदार आहे. अनुह्याचा चष्मा, आयकार्ड, कपडे, सॅक चंद्रभानच्या घरातून सापडले. या वस्तू अनुह्याच्याच आहेत हे स्पष्ट करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडल्या होत्या. तेथून आलेल्या अहवालानुसार या वस्तूंवर अनुह्याचा डीएनए सापडला आहे. अद्याप अनुह्याच्या लॅपटॉपचा शोध लागलेला नाही. हत्येनंतर चंद्रभानने तो चोरला होता. मात्र तो सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्क्रीनवर त्याला स्वत:चा फोटो आढळला. त्यामुळे घाबरून त्याने तो आंबिवली नदीत फेकून दिला होता. गुन्हे शाखेने डायव्हर्सच्या मदतीने आंबिवली व अन्य उपनद्यांची पात्रे शोधली. मात्र लॅपटॉप सापडू शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Witness, FAS due to DNA reports