कनौजियाचा जबाब नोंदविणार

By Admin | Updated: June 17, 2014 03:30 IST2014-06-17T03:30:19+5:302014-06-17T03:30:19+5:30

नेस वाडिया-प्रीती झिंटा प्रकरणात पोलीस मंगळवारी दानिश कनौजिया नावाच्या एका व्यक्तीचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवणार आहेत

Will record the account of Kanaujia | कनौजियाचा जबाब नोंदविणार

कनौजियाचा जबाब नोंदविणार

डिप्पी वांकाणी, मुंबई
नेस वाडिया-प्रीती झिंटा प्रकरणात पोलीस मंगळवारी दानिश कनौजिया नावाच्या एका व्यक्तीचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवणार आहेत.
यासह आणखी एका व्यक्तीचाही साक्षीदार म्हणून जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच पोलिसांनी सोमवारी झिंटा यांना त्यांच्या वकिलामार्फत तीन दिवसांत आपला जबाब नोंदवण्यास समक्ष हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वाडिया आणि झिंटा यांच्यात ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कथित वादावेळी कनौजिया तेथे हजर होता. मात्र, हे दोघेही साक्षीदार नेमके कोण आहेत आणि त्यांचा झिंटा किंवा वाडिया यांच्याशी नेमका काय संबंध आहे, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. घटनास्थळाचे पोलिसांना जे सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते, ते अस्पष्ट असल्याने अन्य कॅमेऱ्यांचे फूटेज पोलीस तपासणार असून, ते लवकरच उपलब्ध होण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली. तसेच सुरुवातीला फूटेजमध्ये काही प्रसारमाध्यमांनी ज्यांना वाडिया समजले होते, ते वाडिया नसून अंकित नावाची व्यक्ती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Will record the account of Kanaujia