शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:41 IST

Sharad pawar Raj Thackeray Uddhav Thackeray News: राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. त्याभोवती राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. त्याबद्दल शरद पवारांनी प्रथमच भाष्य केले. 

Raj Thackeray Uddhav Thackeray Sharad Pawar news: हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनीउद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचे संकेत दिले. त्यावर उद्धव ठाकरेंनीही लागलीच टाळी दिली. या संदर्भात पुढे काही राजकीय घडामोडी घडल्या नसल्या तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र जोरात सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बारामतीमध्ये शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले. त्यांनी याबद्दल भूमिका मांडली. मुंबईच्या निवडणुका जवळ येताना दिसत आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. याबद्दल शरद पवारांना विचारण्यात आले. 

वाचा >>'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत

शरद पवार म्हणाले, "हा त्यांचा कौटुंबीक प्रश्न आहे. याची माहिती माझ्याकडे नाही. मी काही त्यांच्याशी बोललो नाही. आणि त्यावर कसं मी भाष्य करू?"

पवार कुटुंबात एकोपा वाढतोय, शरद पवार म्हणाले...

पवार कुटुंबामध्येही एकोपा वाढताना दिसत आहे, याकडेही पवारांचे लक्ष वेधण्यात आले. 

शरद पवार म्हणाले, "जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. आता हा तुम्ही जो प्रश्न करता की उसाच्या संबंधी. उत्पादन वाढीचा. त्यावर आम्ही बसलो होतो. आम्ही काम करून उपयोग नाही. यात सरकार आलं पाहिजे. सरकारच्या प्रतिनिधींशी बोलणं, यात काहीही चुकीचे नाही."

हिंदी सक्तीचा मुद्दा अन् राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे एकत्र येण्याबद्दल विधान

महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्यात काही अडचण नसल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रातील या मुद्द्यांपेक्षा आमच्यातील वाद खूप छोटे आहेत, असेही ते म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार का? या चर्चेला जास्त हवा मिळाली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण