शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय रुग्णालयात आता रुग्णांवर होणार मोफत उपचार?; मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:49 IST

राज्यातील ४५६ धर्मादाय रुग्णालयांपैकी ७६ रुग्णालये एकट्या मुंबईत

संतोष आंधळे

मुंबई - विधी व न्याय विभागाने सोमवारी राज्यातील धर्मादाय रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना लागू करण्यास सांगितले आहे. तसे झाल्यास सर्वच नागरिकांना धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण ४५६ धर्मादाय रुग्णालये असून त्यापैकी ७६ रुग्णालये मुंबईत आहेत.

विशेष म्हणजे, काही पंचतारांकित रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक उपचार घेऊच शकत नाही इतके उपचार महाग आहे. मात्र किती धर्मादाय रुग्णालये शासनाच्या या योजना लागू करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सोमवारी धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने धर्मादाय रुग्णालयासाठी काही शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये एका शिफारशीनुसार, निर्धन रुग्णनिधी शिल्लक नसल्यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम इत्यादी व अन्य सर्व आरोग्याशी संबंधित योजना लागू कराव्यात, असे सांगितले आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहेत.

विशेष करून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील पंचतारांकित रुग्णालये आहेत ज्याचा समावेश धर्मादाय रुग्णालय वर्गवारीत करण्यात येतो. त्यांनीही महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली तर सर्व नागरिकांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 

उपचारांचे दर ठरवून दिले आहेतशासकीय योजना लागू कराव्यात असे सांगण्यात आले आहे; मात्र बंधनकारक करण्यात आलेले नाही. अनेक धर्मादाय रुग्णालयांचा कल या योजना लागू होऊ नये याकडे अधिक असतो. बहुतांश धर्मादाय रुग्णालये शासनाचे दर परवडत नाहीत म्हणून ही योजना घेत नाही. त्यांनी उपचारांचे जे दर ठरवून दिले आहेत, ते फार कमी असल्याची तक्रार होत आहे. महात्मा फुले योजनेतील उपचाराचे दर बदलण्यासाठी आरोग्य विभागाने एक समिती स्थापन केली आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल