शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांना राष्ट्रवादीत पद मिळणार की सुरक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:33 IST

महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे मंत्रीपदांचे वाटप झालेले असल्याने सध्या एकही मंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे खडसे यांना जर मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल.

अतुल कुलकर्णीमुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का येत आहेत, याविषयी उत्सुकता असून खडसे यांना थेट मंत्रिमंडळात घेण्याऐवजी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्षपद देऊन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे मंत्रीपदांचे वाटप झालेले असल्याने सध्या एकही मंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे खडसे यांना जर मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. विधानपरिषदेवर पाठवायचे तर राज्यपालांनी खडसेंच्या नावाला संमती द्यायला हवी. ती शक्यता कमीच. त्यामुळे तूर्त खडसेंना राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्षपद देऊन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे समजते. खडसेंना कृषी मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असली तरी ते पद सध्या शिवसेनेकडे असून आता खातेबदल होणे नाही, असे एका नेत्याने सांगितले.सध्या खडसे यांना पदापेक्षा सत्तेमुळे मिळणारी सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. तर राष्ट्रवादीला भाजपवर तूटून पडणारा फायरब्रँड नेता हवा आहे. भाजपमध्ये एक मोठा गट खडसे यांच्याविषयी सहानुभूती असणारा आहे. त्यांचे अंत:स्थ हेतू खडसे यांंच्या बोलण्याने साध्य होणार असतील तर ते त्यांना हवेच आहेत. या कारणांमुळे खडसे यांंच्या पक्ष प्रवेशाचा मार्ग सोपा झाल्याचे राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले.पद हवे असते तर पक्ष बदलला असतामला पदच हवे असते तर मी कधीच पक्ष बदलला असता. आपण विरोधी पक्ष नेते असताना पक्ष वाढीसाठी केलेले काम देखील कधीतरी फडणवीस यांनी सांगावे. त्यावेळी ते कोणकोणती कामे घेऊन माझ्याकडे आले हे आजवर कधी बोललो नाही. याच देवेंद्र फडणवीस यांना किती विषयांवर सभागृहात भाषणे करण्याची संधी मी दिली हे देखील त्यांनी सांगावे, असे सांगून खडसे म्हणाले, माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे, सतत मला बदनाम करण्यामुळे मी पक्ष सोडला आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मला भाजपमध्ये काहीही मिळणार नाही हे माहिती असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस