शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
2
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
3
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
4
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
5
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
6
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
7
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
8
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
9
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
10
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
11
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
12
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
13
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
14
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
15
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
16
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
17
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
18
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
19
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
20
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी कटिबद्ध राहणार- सोले

By admin | Updated: June 15, 2014 00:40 IST

महापौरपदावर कार्य करताना आरोग्य आणि शिक्षण सेवेत सुधारणा घडवून नागनदीची स्वच्छता, शहरात हरितक्रांतीची योजना, वृक्षारोपण, तलावांना निर्माल्यमुक्त करणे आदी कामे तडीस नेली.

सहा जिल्ह्यांचा दौरा : पदवीधरांना मागितले समर्थननागपूर : महापौरपदावर कार्य करताना आरोग्य आणि शिक्षण सेवेत सुधारणा घडवून नागनदीची स्वच्छता, शहरात हरितक्रांतीची योजना, वृक्षारोपण, तलावांना निर्माल्यमुक्त करणे आदी कामे तडीस नेली. यानंतरही भविष्यात विकासकामांसाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांनी दिले. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल सोले यांनी विभागातील सहा जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी त्यांनी महापौर म्हणून काम करताना केलेल्या विकासकामांची माहिती देऊन नागपूर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते तयार करून शहराला वाहतुकीसाठी सुलभ रस्ते तयार करून दिल्याचे सांगितले. याशिवाय इंदोरा दहीबाजार पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून हा पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला केल्याचे सांगितले. या विकासकामांमुळे नागपूर शहराला देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून पदक प्राप्त झाले असून भविष्यात विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनिल सोले यांनी नागपूर विद्यापीठ परिसर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट, डब्लुसीएल, वनविभाग, दूरदर्शन, दूरसंचार विभाग, सरकारी प्रेस, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफिस, शिक्षकांचा अभ्यासवर्ग, सीपीडब्ल्यूडी विभाग, पूर्व नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर आदी परिसराचा दौरा केला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र बडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत सोलेंना पाठिंबा जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)