शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे निधन

By admin | Updated: June 18, 2014 01:32 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ८ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ८ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अंबाझरी घाटावर सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. हैदराबाद येथे सिंगारेनी कोलयारी कंपनी लिमिटेडच्या बैठकीसाठी गेले असताना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते कोमात असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रदीर्घ उपचारानंतर मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवाला हैदराबाद येथून नागपुरात आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. दिनेश गर्ग यांनी १ मे २००७ साली वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात वेकोलिने अनेक मोठ्या प्रकल्पांवर कार्य केले. आपल्या प्रशासकीय कौशल्यासाठी ख्याती मिळविलेल्या दिनेश गर्ग यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९५४ साली झाला. भूगर्भशास्त्र या विषयात एम.एस्सीची पदवी घेतल्यावर ते कोल इंडियात रुजू झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी इंग्लंड व अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण प्राप्त केले. नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड, बीसीसीएलमध्येही त्यांनी काम केले. वेकोलिचे अध्यक्षपद भूषविण्यापूर्वी ते बीसीसीएलमध्ये कार्मिक संचालक पदावर तीन वर्षे कार्यरत होते. ते सिंगारेनी कोलयारी कंपनी लिमिटेडच्या शासकीय संचालक पदावरही कार्यरत होते. कोल इंडियासह देशातील कोळसा खाण क्षेत्रातील अनेक संस्थांसोबत त्यांची नाळ जुळली होती.कोल इंडियामध्ये ते कायमस्वरूपी निमंत्रित संचालक होते. भारतातील खाण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांनी कोळसा खाणीच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी अनेक देशाचे दौरे केले.(प्रतिनिधी)