शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 18:21 IST

भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत असून त्यांच्याजागी नवीन अध्यक्ष भाजपाला मिळणार आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत. 

नवी दिल्ली - मोदी-शाह यांच्या कार्यशैलीकडे पाहिले तर पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असेल हे कुणालाही माहिती नाही. अचानक कुणाला फोन येईल आणि तुम्हाला केंद्रीय नेतृत्व करायचंय सांगितलं जाईल. ही नवीन भाजपा असून याठिकाणी निर्णय अत्यंत गोपनीय पद्धतीने घेतले जातात. मात्र तरीही अनेकदा सूत्रांच्या आधारे जे अंदाज वर्तवले जातात ते खरे ठरतात. 

राष्ट्रपतीपदावेळी अनेक लोकांसोबत द्रौपदी मुर्मू यांचं नाव चर्चेत होतं, अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. आता भाजपा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. पक्षातील बी.एल संतोष, सुनील बन्सल, फग्गन सिंह कुलस्ते, केशव प्रसाद मोर्या ही नावे चर्चेत आहेत. या नावांसोबतच आणखी एक नाव प्रखरतेने पुढे येतंय ते म्हणजे महाराष्ट्रातील नेते आणि सध्या बिहारचे प्रभारी असलेले विनोद तावडे. उत्तर भारतात कमी लोक त्यांना ओळखतात. मात्र लोकसभा निवडणुकीत अनेक वृत्तपत्रात ते झळकले आहेत. त्यामुळे विनोद तावडेंच्या जमेच्या बाजू कोणत्या हे जाणून घेऊ. 

मराठा चेहरा 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात फटका बसला. या निकालामागे मराठा फॅक्टर हेदेखील एक कारण मानलं जातं. भाजपाला राज्यात कायम मराठा नेतृत्वाची कमतरता भासत राहिली. तावडे हे मराठा समाजातून येतात. २०१९ मध्ये पक्षाने त्यांचं तिकिट कापलं. तरीही ते निराश न होता राष्ट्रीय स्तरावर पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळली. मागील ४ वर्षात विनोद तावडे यांनी त्यांच्या कामाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यात विशेषत: नितीश कुमार यांना पुन्हा एनडीएसोबत आणण्यात तावडेंचं मोठं योगदान आहे.

पक्ष संघटनेत उल्लेखनीय काम

गेल्या अनेक वर्षापासून विनोद तावडे पक्ष संघटनेत विविध पदावर कार्यरत आहेत. त्यांना केवळ पद मिळालं नाही तर त्या पदाला न्याय देण्याचं काम विनोद तावडेंनी केले. तावडे हे सध्या पक्षात सक्रीय पदाधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश करण्यात त्यांची भूमिका आहे. इंडिया आघाडीत नितीश कुमार यांची मुख्य भूमिका होती. मात्र विनोद तावडेंनी ज्याप्रकारे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला रोखत नितीश कुमारांना भाजपासोबत पुन्हा आणलं. इतकेच नाही तर बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत एनडीएनं चांगली कामगिरी केली. त्यामुळे तावडेंचं हे संघटन कौशल्य पाहता त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. 

संघाशी जवळीक

आरएसएस आणि भाजपा यांच्यात दुरावा झाल्याचं चित्र सध्या सुरू आहे. निवडणुकीत जे.पी. नड्डा यांनी आरएसएसबाबत केलेले विधान चांगलेच गाजले. त्यानंतर आता आरएसएस सातत्याने सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत आहे.  त्यामुळे भाजपा आणि आरएसएस यांच्यातील संबंध फारसे ताणले जाणार नाहीत त्यादृष्टीने  अध्यक्षपदी अशा व्यक्तीची नेमणूक केली जाईल ज्याचे पक्ष आणि संघातील नेत्यांशी जवळीक असेल. विनोद तावडे संघातून येतात. त्यांनी संघात आणि पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल