पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 07:08 IST2025-11-10T07:08:24+5:302025-11-10T07:08:47+5:30
Mundhva Land Scam: मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेले बेकायदा खरेदीखत आज, सोमवारी (दि. १०) रद्द होण्याची शक्यता आहे. यासाठी ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.

पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
पुणे - मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेले बेकायदा खरेदीखत आज, सोमवारी (दि. १०) रद्द होण्याची शक्यता आहे. यासाठी ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख असताना ही रक्कम कोण आणि कशी भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणात सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती सोमवारी पुण्यात येण्याची शक्यता आहे.
...तरच व्यवहार रद्द होणार
हा व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार आहे. यासाठीही संपूर्ण ७ टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यामुळे ४२ कोटी रुपये अधिक त्यावरील दंड सुमारे ३ लाख ६० हजार रुपये भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द होईल.
नेमके कोण हजर राहणार? : खरेदीखतावेळी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि अमेडिया इंटरप्राईजेस एलएलबीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील हे दोघे हजर होते. व्यवहार रद्द करण्यासाठी या दोघांनाही हजर राहावे लागणार आहे.