शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण लावणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 04:22 IST

शहरातील मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.

नागपूर : शहरातील मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यात महानगरपालिका प्रशासनाला अपयश आले आहे.मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या विषयावरील दाखल जनहित याचिकेची दखल घेत कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिले होते. तसेच सोबतच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. महानगरपालिकेने सुरुवातीला न्यायालयाच्या आदेशानुसार नसबंदी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर ही मोहीम थंडावली. २०१४ पासून अद्याप नियंत्रण समिती गठित करण्यात आलेली नाही. मोकाट कुत्र्यांची विस्तृत माहिती संकलित करण्यासाठी अद्याप सर्वे करण्यात आलेला नाही. तसेच नियंत्रण समिती गठित करण्यात आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे अद्यापही शहरातील मोकाट कुत्र्यांची इत्थंभूत माहिती नाही. एवढेच नव्हे तर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या या विभागाकडे नाही.नसबंदीबाबत आरोग्य विभाग उदासीनमहानगरपालिके च्या आरोग्य विभागातील अधिकारी २००६ ते २०१४ नागपूर शहरात कुत्र्यांवरील नसबंदी उपक्रम राबविला जात असल्याचा दावा करीत असले तरी गेल्या काही वर्षातील नसबंदीचे आकडे धक्कादायक आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २००६ या वर्षात १७,१७१, मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. २००७ या वर्षात २६५०३, २००८ मध्ये १७१७१ मोकाट कुत्र्यांवर नोंद करण्यात आली होती. २००९ या वर्षात ५७३२, २०१० मध्ये २१९७, तर २०१४ मध्ये १०,२६० कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली. यावरून आरोग्य विभागच उदासीन असल्याचे चित्र आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघनमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ जून २०१४ रोजी दोन याचिकांचा निपटारा करताना शहरातील मोकाट कुत्र्यांना आळा घालण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्या, मोकाट कुत्र्यांची ठिकाणे, त्यांचे खाद्य व इतर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नियंत्रण समिती गठित करा. तसेच कुंत्र्यावर नसबंदी करण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु महानगरपालिकेने आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. सुनावणी प्रलंबित मोकाट कुत्र्यांशी संबंधित याचिकावरील सुनावणी उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील एका गैरसरकारी संस्थेने विशेष याचिका दाखल केले होते. यावरील सुनावणी करताना न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत मोकाट कुत्र्यासंबंधी दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत यासंबंधीच्या प्रकरणावरील सुनावणी सुरू करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले.आदेशानुसार कार्यवाहीशहरातील मोकाट कुत्र्यासंदर्भात सुनावणी योग्यप्रकारे होणार नाही. याची अंमलबजावणी आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या कोंडवाडा व आरोग्य विभगाच्या अधिकाऱ्यांनी तयार केला असल्याची माहिती पशुचिकित्सा अधिकारी गजेंद्र महल्ले यांनी दिली. (प्रतिनिधी)