शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 05:30 IST

सेवाज्येष्ठतेनुसार १९९० च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग आता सात नावांपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवेल आणि त्यानंतर राज्य सरकार त्यातील एकाची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करेल. जी सात नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत, त्यात सदानंद दाते यांच्याशिवाय पोलिस महासंचालक (विधी व तांत्रिक) संजय वर्मा, गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीव कुमार सिंगल, पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण) अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे संचालक संजीव कुमार, पोलिस महासंचालक (रेल्वे पोलिस) प्रशांत बुरडे यांचा समावेश आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार १९९० च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. २६/११ हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे आणि सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर एनआयएचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 

एक महिन्यासाठी बनले होते संजय वर्मा डीजी फोन टॅपिंगच्या आरोपांतून मुक्त झालेल्या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य पोलिस दलातील ४८ व्या आणि पहिल्या महिला पोलिस महासंचालक आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान रश्मी शुक्ला यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आले. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय वर्मा यांना निवडणुकीच्या काळात एक महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकानंतर पुन्हा महासंचालकपदाची सूत्रे शुक्ला यांच्या हातात देण्यात आली.

दाते कडक शिस्तीचे कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दाते यांनी मुंबईसह आणि केंद्रात महत्त्वाच्या, संवेदनशील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या आहेत. मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे), राज्य दक्षतवादविरोधी पथकाचे प्रमुख पदही त्यांनी हाताळले आहे.

दाते सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या दाते यांना राज्यात पोलिस महासंचालक म्हणून आणायचे असेल तर, तशी विनंती राज्य सरकारला केंद्राकडे करावी लागणार आहे. दाते यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. मात्र, जर त्यांना डीजीपी म्हणून नियुक्त केले गेले तर त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : New Maharashtra Police Chief: Sadanand Date's Name in Discussion

Web Summary : Rashmi Shukla retires; Sadanand Date is a frontrunner for Maharashtra's top cop. Seven names sent to the Union Public Service Commission. Date, currently NIA chief, is a strong contender known for his bravery and integrity.
टॅग्स :Policeपोलिस