शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:08 IST

Rohini Khadse And Vaishnavi Hagawane Case : रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासावरून संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासावरून संताप व्यक्त केला आहे.

“अरे कुणाला मूर्ख बनवता? सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या तहान बाळाचा विचार करा?” असं म्हटलं आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

“#वैष्णवी_हागवणे प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. असं मी म्हणत नाही तर आ. मोनिका रांजळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेली समिती म्हणत आहे.”

“काल #विधानसभेत या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही.”

“अरे कुणाला मूर्ख बनवता? सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. असे असताना 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील ? मी आधीच म्हटले होते, प्रकरण ताजे असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असे दाखवले जाईल, प्रकरण शांत झाले की आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाईल आणि तसंच घडतंय! शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या तहान बाळाचा विचार करा?” असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी