महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शनिवार, २ मे २०२६) रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकालबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या सकाळी ११:०० वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल जाहीर केला जाईल.
बारावीचा निकाल कुठे पाहायचा?
विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी १:०० वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
बारावीचा निकाल कसा पाहायचा?
१. वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा.२. होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.३. तुमचा रोल नंबर/आसन क्रमांक टाका.४. आईचे नाव (पहिले नाव) टाइप करा.५. 'View Result' बटणावर क्लिक करा.६. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
Web Summary : Maharashtra Board's HSC result for 2026 will be declared tomorrow, May 2nd, at 1:00 PM. Students can check results on mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, and mahahsscboard.in. A press conference will detail the results at 11:00 AM.
Web Summary : महाराष्ट्र बोर्ड का एचएससी परिणाम 2026 कल, 2 मई को दोपहर 1:00 बजे घोषित किया जाएगा। छात्र mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, और mahahsscboard.in पर परिणाम देख सकते हैं। एक प्रेस कॉन्फ्रेंस में सुबह 11:00 बजे परिणामों का विवरण दिया जाएगा।