1 / 8बॉलिवूडमधील अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याच्या अधुनमधून उघडकीस येत असतात. आता अभिनेत्री मदालसा शर्मा हिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाबाबत माहिती दिली आहे. एका प्रसिद्ध फिल्ममेकरने आपल्या बिकिनी परिधान करण्यास सांगितले होते, असे मदालसा हिने सांगितले. 2 / 8Hauterrfly च्या पॉडकास्टमध्ये मदालसा शर्मा हिने सांगितले की, एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला चित्रपटाच्या मिटिंगसाठी बोलावले होते. तेव्हा त्याने मला त्याच्यासमोर बिकिनी परिधान करण्यास सांगितले होते. 3 / 8मदालसा म्हणाली की, तेव्हा मी १९ वर्षांची होते. मी तिथे गेल्यावर तो दिग्दर्शक म्हणाला की, मी अशा तरुणीचा शोध घेत आहे जी बिकिनी परिधान करण्यास कम्फर्टेबल असेल. 4 / 8मला वाटलं बिकिनी परिधान करणं ही काही मोठी बाब नाही. त्यामुळे मी चालेल असं सांगितलं. मात्र मी आधी स्टोरी जाणून घेऊ इच्छिते. बिकिनी परिधान करणं हा कथानकाचा भाग आहे की त्यात काही वेगळा अँगल आहे, हे मला पाहायचं आहे, असेही त्याला सांगितले. 5 / 8तेव्हा तो दिग्दर्शक म्हणाला की, तू बिकिनी परिधान करू शकतेस का? हे मला पाहायचं आहे. मला तुझी बॉडी लँग्वेज पाहायची आहे. बिकिनी परिधान करून तू कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल राहू शकशील का, हे मला पाहायचं आहे. 6 / 8 त्यानंतर मी त्या दिग्दर्शकास सांगितले की, सॉरी, मी एक व्यावसायिक अभिनेत्री आहे. तसेच जर कथानकामध्ये बिकिनी सीनची आवश्यकता असेल किंवा साडीची आवश्यकता असेल, जे असेल ते मी परिधान करेन आणि कम्फर्टेबल राहीन, कारण हा माझ्या कामाचा भाग आहे. मात्र तुमच्यासमोर बिकिनी परिधान करणे हा माझ्या कामाचा भाग नाही. त्यामुळे माझं टॅलेंट पाहून माझी निवड करायची तर करा, नाहीतर दरवाजा कुठे आहे हे मला माहिती आहे. 7 / 8मी एवढं सांगून तिथून निघून गेले. तो दिग्दर्शक काय विचार करेल, याची पर्वा मी केली नाही. काही दिवसानंतर तो दिग्दर्शक ती भूमिका करत असलेल्या अभिनेत्रीला डेट करत होता, असे मला समजले, असे मदालसा हिने सांगितले. 8 / 8 मदालसा शर्मा हिला अनुपमामधील काव्याच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. तसेच तिने २०१८ साली मिथुन चक्रवर्तींचा मुलगा महाक्षय ऊर्फ मिमोह चक्रवर्तीसोबत लग्न केलं होतं. सध्या हे दोघेही आनंदाने संसार करत आहेत.