शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा व्यवसाय प्रशिक्षणाला घरघर; समिती देणार अंतिम अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 02:04 IST

विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद, या योजनेला २०१३-१४ पासून केंद्राचा निधी मिळाला नसून राज्य योजनेतून याचा खर्च भागवला जात आहे.

सीमा महांगडेमुंबई : शासकीय आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे ही केंद्र सरकारकडून निधी प्राप्त न होणे, अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रतिसाद न देणे अशा अनेक कारणांमुळे बंद करण्याचा विचार आदिवासी विकास विभागाकडून सुरू आहे. यासाठी विभागाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती आपला अहवाल ३ महिन्यांत सादर करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.

आदिवासी युवकांकरिता स्थानिक गरजांवर आधारित छाेटे प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणे, अत्यंत गरजेची यंत्रे व अवजारे स्थानिकरीत्या दुरुस्त करून घेण्याच्या दृष्टीने कुशल कारागीर उपलब्ध करून देणे, हा या आश्रमशाळांमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या राज्यात १५ बेसिक पोस्ट आश्रमशाळांतील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांत ११४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. 

मात्र या योजनेला २०१३-१४ पासून केंद्राचा निधी मिळाला नसून राज्य योजनेतून याचा खर्च भागवला जात आहे. योजना सुरू झाल्यापासून प्रशिक्षण अभ्यासक्रमाचेही अद्ययावतीकरण झाले नसल्याने विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यातील काही केंद्रे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित केंद्रांविषयी काय निर्णय घ्यावा? तेथील अभ्यासक्रमाचे मूल्यांकन करून सुधारित अभ्यासक्रम राबविता येईल का? केंद्र बंद करायचे झाल्यास तेथील कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे व कुठे करता येईल याचा अभ्यास करून समिती अहवाल सादर करेल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची भीतीया योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन तसेच प्रशिक्षणानंतर ३ महिने शहरी भागातील कार्यशाळेत प्रात्यक्षिकांची संधी, आवश्यक कच्चे साहित्य व अनुषंगिक अवजारे पुरविण्यात येतात. त्यामुळे ही योजना बंद केल्यास आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याची मते तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना