शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस; शरद पवारांच्या नव्या विधानामुळे 'बिघाडी'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:03 IST

शरद पवारांचं उपमुख्यमंत्रिपदाबद्दल सूचक विधान

मुंबई: जवळपास महिनाभराच्या संघर्षानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोठा वाटा होता. शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. मात्र आता शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी मंत्रिपदांच्या वाटपाबद्दल खरंच समाधानी आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडीनं बहुमतदेखील सिद्ध केलं. सरकार सुरळीतपणे चालवण्यासाठी तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमदेखील आखला आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदावरुन शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप मंत्रालयांचं वाटप झालेलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी उपमुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीला मंत्रिपदांच्या वाटपात काय मिळालं, असा सवाल शरद पवार यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारला. 'राष्ट्रवादीकडे शिवसेनेपेक्षा केवळ दोन आमदार कमी आहेत. मात्र आमच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा दहानं जास्त आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे. तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. मात्र माझ्या पक्षाला काय मिळालं? उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नसतात,' असं पवारांनी म्हटलं. मंत्रिपदांच्या वाटपात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळालं असलं तरीही पक्षानं अद्याप यासाठी कोणाचंही नाव निश्चित केलेलं नाही.  

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना