शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात बावाजीचा सन्मान कशासाठी ?

By admin | Updated: August 17, 2014 00:54 IST

उपराजधानीत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमातील ‘हे‘ छायाचित्र आहे. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मत्री सतीश चतुर्वेदी दिसत आहे. त्यांच्या शेजारी नागपुरातील

थेट मुख्यमंत्र्यांसोबतच मंचावर : फोटोही काढले नरेश डोंगरे - नागपूर उपराजधानीत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमातील ‘हे‘ छायाचित्र आहे. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मत्री सतीश चतुर्वेदी दिसत आहे. त्यांच्या शेजारी नागपुरातील कुख्यात जुगार अड्डा चालक अशोक बावाजी ऊर्फ अशोक यादवही दिसत आहे. कुख्यात बावाजीच्या जुगार अड्ड्यावर अलीकडेच पोलिसांनी मोठी धाड टाकली. या धाडीत सव्वासहा लाख रुपये सापडले. जुगार खेळताना काही ‘मोठ्या‘ लोकांनाही पकडण्यात आले. यात बिल्डर, नगरसेवकाचाही समावेश आहे. अलीकडच्या काळातील नागपुरातील ही मोठी कारवाई आहे. अशोक बावाजी या कुख्यात जुगार अड्डा चालकाला कुणी हात लावायची हिंमत करीत नव्हते. मात्र,पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार आणि त्यांच्या चमूने कुख्यात बावाजीला दणका दिला. नेत्यांनी विचार करायला हवाबावाजीला कुणी हात लावू शकत नाही, असे राजकीय क्षेत्रात नेहमीच बोलले जायचे. याचे कारण ‘अशा छायाचित्रात’ दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसोबत यायचे, छायाचित्र काढून घ्यायचे आणि अप्रत्यक्षरीत्या आपल्या अवैध धंद्यांना संरक्षण मिळवायचे, असे या बावाजीचे धंदे आहेत. ज्या व्यक्तीची आपण मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देत आहोत ती सज्जन की दुर्जन, याचा विचार स्थानिक नेत्याने केला पाहिजे. या घटनेत तसे झालेले दिसत नाही. बावाजीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देणे ही या स्थानिक नेत्याची मजबुरी असावी.यामुळे मुख्यमंत्री आणि पक्षाची बदनामी होत आहे, याची जाणीव स्थानिक नेत्याने ठेवायला हवी. (प्रतिनिधी)राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सर्वत्र बोलले जाते. गुन्हेगारांना राजकीय पक्ष निवडणुकीत उभे करतात आणि ते निवडूनही येतात. हाच कुख्यात अशोक बावाजी उद्या चुकून नगरसेवक किंवा आमदार झाला, तर दोष कुणाला द्यायचा ?