शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईस विलंब का?

By admin | Updated: October 9, 2015 01:35 IST

बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात निव्वळ अधिसूचना काढलीत, पण त्यावर अंमलबजावणी केव्हा करणार? असे खडे बोल सुनावत, उच्च न्यायालयाने एका आठवड्यात अधिसूचनेवर

मुंबई : बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात निव्वळ अधिसूचना काढलीत, पण त्यावर अंमलबजावणी केव्हा करणार? असे खडे बोल सुनावत, उच्च न्यायालयाने एका आठवड्यात अधिसूचनेवर कशाप्रकारे अंमलबजावणी करणार, याची संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला गुरुवारी दिला.‘५ मे २०११ रोजी अधिसूचना काढूनही अद्याप त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. आम्ही वारंवार आदेश देऊनही तुमची (सरकार) समिती केवळ बैठकावर बैठका घेत आहे, निर्णय घेत नाही. तुम्ही अधिसूचनेवर किती कालावधीत अंमलबजावणी करणार, त्याचे नियोजन आमच्यापुढे सादर करा,’ असा आदेश न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला. त्यावर सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी हा विषय संवेदनशील असल्याने, निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने सरकारची खरडपट्टी काढली. अधिसूचनेवर अंमलबजावणी करायची नसेल, तर स्पष्ट सांगा. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकार काही करू शकत नसेल, तर आम्ही आदेश देऊ, असे खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले.महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांची मोजदाद महापालिकेने केली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. महापालिकेने शहारातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांसदर्भातील अहवाल तयार करून समितीपुढे सादर केला . पुढील कार्यवाही समिती करेल, असे अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला सांगितले. या आधीच्या सुनावणीवेळी, सरकारने सात महापालिकांनी सादर केलेल्या अहवालानुसार, १ फेब्रुवारी २०१५ पर्यंत असलेल्या ६,३३६ बेकायदेशीर धार्मिक स्थळांपैकी २०७ नियमित करण्यात आली. १७९ हटवली, तर तीन धार्मिंक स्थळे अन्य जागेवर हलविले. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालय २००९ सालचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी देशातील सर्व राज्यांना बेकायदेशीर धार्मिक स्थळे तोडण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानंतर अस्तित्त्वात आलेली बेकायदेशीर धार्मिक स्थळे तोडण्याबाबत, तर काही धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत, तर काही धार्मिक स्थळांना अन्य जागेवर हलवण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ मे २०११ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेत धार्मिंक स्थळांची श्रेणी ठरवण्यासाठी राज्य, जिल्हा आणि महापालिका पातळीवर समिती नेमण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या अधिसूचनेवर अंमलबजावणी न करण्यात आल्याने, ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या एनजीओने उच्च न्यायालायात सिव्हिल अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होती.