शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यात आठवडेबाजाराची संभ्रमावस्था

By admin | Updated: June 8, 2017 01:15 IST

शेतमालाचे होणारे नुकसान पाहता ठिकठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपामुळे विविध ठिकाणी होत असलेली आंदोलने व त्यामध्ये शेतमालाचे होणारे नुकसान पाहता ठिकठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी स्वयंस्फूर्तीने बाजार बंद ठेवण्यात आले, तर काही ठिकाणी आंदोलकांनी बाजार बंद पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असणारा असंतोष मोठ्या प्रमाणात उफाळून आला. दरम्यान, या संपामध्ये व्यापाऱ्यांसह सर्वच घटकाने आपला सहभाग नोंदवून या संपाला पाठिंबा दिल्यामुळे याचे रूपांतर एका संघर्षात झाले.ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अजून पूर्णपणे पूर्वपदावर न आल्यामुळे यापुढील होऊ घातलेल्या बाजारबाबत नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. कुरकुंभ येथील आठवडे बाजार गुरुवारी भरत असतो व प्रामुख्याने मोठी आर्थिक उलाढाल असणारा हा बाजार आहे. मागील गुरुवारी सुरक्षिततेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी संध्याकाळी दुकाने लावल्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा माल ग्राहकांना फुकटात वाटप करून संताप व्यक्त केला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले होते.शेतकऱ्यांच्या संपाला जवळपास सात दिवस होत असून, त्यामुळे भाजीपाला व इतर शेतीमाल पूर्ण क्षमतेने ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वाढीव किमतीने उपलब्ध असणारा माल ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामुळे लोकसंख्येत झालेला प्रचंड बदल व वाढत्या नागरिकीकरणाने येथील सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. छोटे छोटे उत्पन्न असणारे व्यापारी तसेच कामगार व सामान्य नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.>ग्रामपंचायत व पोलिसांच्या कार्यवाहीकडे लक्षशेतकऱ्यांच्या बंदला मागील गुरुवारी ग्रामपंचायतने स्वत:हून पुढाकार घेत शेतकरी व व्यापाऱ्यांच्या संघर्षात काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या घटनेला जवळपास आठवडा उलटला असून, आज गुरुवारी काय परिस्थिती राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.>लोणीत आठवडाबाजार बंद पाळून निषेधआंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथील ग्रामस्थांनी आजचा तर धामणी येथील ग्रामस्थांनी सोमवारचा आठवडाबाजार बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. पूर्व भागातील सर्वच गावांत आता संपाची तीव्रता जाणवू लागली आहे. आज लोणीतील बाजारतळावर शुकशुकाट होता. माजी सरपंच सावळेराम नाईक, उद्धवराव लंके, जगन लंके, हैबती आढाव, पिंटू पडवळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश वाळूंज आदी ग्रामस्थांनी बाजारतळावर येऊन राज्य सरकारचा फलक लिहून निषेध केला.>अखेर बाजार झाला सुरूळीतमंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आज सुरळीत झाला. १५०० डागांची आवक झाली आहे. फ्लॉ^वरची आवक सर्वाधिक झाली. सहा दिवसांपासून फ्लॉ^वर शेतात होती. तिची तोडणी करून आज बाजारात आणल्याने प्रतवारी ढासळून बाजारभाव कमी झाले. इतर शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला.शेतकरी संप सुरू झाल्यापासून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सलग सहा दिवस बंद होते. शेतकरी त्यांचा माल विक्रीसाठी आणत नव्हते. व्यापारी हजर राहत असूनही शेतमाल येत नसल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प होते. सहा दिवसांत एकही पोते विक्रीसाठी आले नाही. त्यामुळे दिवसभर शुकशुकाट असायचा. संपामळे लाखो रूपयांची उलाढाल थंडावली. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले.मंगळवारी व्यापार्यांनी चर्चा करून बुधवारी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आज बाजार समितीतील व्यवहार पुर्वीप्रमाणेच सुरू झाले. शेतकरी त्यांचा शेतमाल घेवून मोठया संख्येने आले होत. बाजार समितीच्या आवारात वाहनांची गर्दी झाली होती. इतर दिवसांपेक्षा आवक काहीशी कमी होती. १५०० डागांची आवक झाल्याची माहिती किरण शिंदे यांनी दिली. खरेदीदार आल्याने मालाची विक्री झाली. फ्ला^ॅवर पिक सहा दिवस शेतात राखुन ठेवावे लागले होते. ही फ्ला^ॅवर शेतकऱ्यांनी आज बाजारात आणल्याने प्रचंड आवक वाढली. फ्ला^वर चांगल्या प्रतीची नसल्याने तिचे बाजारभाव ढासळले गेले. इतर मालाला चांगला बाजारभाव मिळाला.मंचर शहरात किरकोळ पध्दतीने होणारी तरकारी, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद होती. त्यामुळे गृहीणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. भाजीपाला विक्रीची छोटी छोटी दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कडधान्यांचा वापर रोजच्या आहारात वाढला होता. >थेऊरचा आठवडेबाजार बंदशेतकरी संपाच्या सातव्या दिवशी आलेला थेऊर (ता. हवेली) येथील आठवडे बाजार संपास पाठिंबा म्हणून बंद ठेवण्यात आला. बाजार वगळता गावांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होते. परंतु, आठवडेबाजार न भरल्याने आठवडाभर भाजीसाठी काय करावयाचे? या प्रश्नाने गृहिनींना सतावल्याचे दृष्य परिसरात दिसत होते.थेऊर गावात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आठवडेबाजार आल्याने पाठिंबा म्हणून ग्रामपंचायत थेऊर व ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनानुसार तो आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाजारात भाजीपाला स्वस्त तोही ताजा मिळत असल्याने थेऊरसह कोलवडी, साष्टे, नायगाव, पेठ आदी गावांतून मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांची बुधवारी गर्दी होत असल्याने थेऊर गावाला यात्रेचे स्वरूप येते. परंतु, आज बाजार न भरल्याने खरेदीसाठी तुरळक प्रमाणात आलेल्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.शेतकरी संप सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल आणणे टाळले, तर संपकरी मालाची नासधूस करतील या भीतीने अनेक व्यापाऱ्यांनी न येणे पसंत केले.>आठवडे बाजारही भरला नाहीनिमोणे (ता. शिरूर) येथील आठवडे बाजारही आज शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर भरला नाही. त्यामुळे या आंदोलनाची धग परिसरात कायम असल्याचे चित्र आहे.सध्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी, शेतीमाल व दुधास रास्तभाव, वीजबिलात सवलत, खत व बी -बीयाणांच्या रास्त किंमती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात इ. मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलने चालू आहेत. विविध पातळ्यांवर हे आंदोलन चालू आहे.१ जूनपासुन सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये निमोणे ( ता. शिरूर ) येथील शेतकरी, दूधउत्पादक व दुकानदार अग्रभागी आहेत. १ जून रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये येथील शेतकऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदवला होता. यावेळी गावामधून कोणताही शेतीमाल बाहेर गेला नाही. तसेच दुधाचा एकही थेंब संकलित झाला नाही. सर्व शेतकरी या संपास सहभागी होऊन रस्त्यावर उतरला होता. पुणतांबा येथील मुख्यमंत्री व कोअर कमिटीचा कर्जमाफीचा निर्णय मान्य न नसल्याने ४ जून रोजी पुन्हा गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी सर्व व्यापारी व दुकानदार यांनाही या बंदला उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिला होता. आज बुधवार दि. ७ रोजी होणाऱ्या आठवडे बाजाराकडे सर्व सामान्य लोकांचे लक्ष लागले होते. मात्र आजही सर्व शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार आजचा आठवडे बाजार पूर्णत: बंद राहिला.