Maharashtra Weather Update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:11 PM2021-05-29T17:11:45+5:302021-05-29T17:13:52+5:30

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Weather forecast today IMD alert in next 5 days thunderstorm lightning and mod rains likley in Maharashtra | Maharashtra Weather Update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

googlenewsNext

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

विजांच्या कडकडाटासह तीन तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहील. सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या तीन तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे. 

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वसमत, औंढा ,कळमनुरी या तालुक्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे.
 

Read in English

Web Title: Weather forecast today IMD alert in next 5 days thunderstorm lightning and mod rains likley in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.