शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही एकत्रच लढणार

By admin | Updated: September 16, 2014 02:21 IST

आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी परदेशातून परतल्यानंतर तीन-चार दिवसांत होईल.

कोल्हापूर : आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी परदेशातून परतल्यानंतर तीन-चार दिवसांत होईल. काही झाले तरी दोन्ही काँग्रेस एकत्रितपणो निवडणुकीला सामोरे जातील हे एकदा ठरले असल्याने जागा वाटपाबाबत फार अडचणी येणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय प्रचार प्रारंभ मंगळवारी येथे जाहीर सभेने होत आहे. त्यासाठी पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.   लोकसभा निवडणुकीत मोदी यांची लाट नव्हती व अशा अनेक लाटा मुंबईने आतार्पयत पाहिल्या असल्याचा निष्कर्ष भाजपाच्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांनीच काढला आहे. त्यामुळे आम्ही तसे म्हणणार नाही. लोकसभेला जो निकाल महाराष्ट्रात लागला त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही. यापूर्वी 2क्क्4 ला केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात मात्र जनतेने काँग्रेस आघाडीच्याच हाती सत्ता दिली. तसेच यावेळीलाही होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.  (प्रतिनिधी) 
 
यांना कोण गांभिर्याने घेणार?
राज्यातील सरकारवर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व प्रकाश जावडेकर हे टीका करत आहेत. त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. या नेत्यांची वक्तव्ये ग्रामीण भागातील जनताही फारशा गांभीर्याने घेत नाही, असेही पवार म्हणाले.
गळती नव्हे कारवाईची भीती
‘राष्ट्रवादी’ ला सर्वाधिक गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर पवार म्हणाले,‘वस्तूस्थिती तशी नाही. जेवढे गेले, त्याहून जास्त आमदारांनी आजच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे लोक सोडून गेले, त्यांनी कारभार सुधारावा अशा सूचना दिल्या होत्या़ परंतु तो सुधारला नसल्याने कारवाई होणार ही चाहुल लागल्यावर त्यांनी पक्ष सोडला आहे.’
‘सोशल’ बदनामी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल जी सोशल मीडियावरून बदनामी सुरु आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.