We will be back by talking with Congress; NCP assured to Governor of maharashtra | महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

मुंबई : भाजपा, शिवसेना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे पत्र दिले असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 


तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेचे पत्र दिले आहे. उद्या रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यास सांगितले आहे. आम्ही उद्या काँग्रेस नेत्यांशी बोलून आमचा निर्णय कळवू असे सांगितल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 


तत्पुर्वी रात्री 8.30 वाजता राजभवनातून फोन आला. तुम्ही मला भेटायला या. आम्ही निघालो आहोत. त्यांनी कशासाठी बोलावले याबाबत मला माहिती नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. त्याच्यासोबत जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेते राजभवनात गेले होते. 


महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी मोठे वळण घेतले आहे. शिवसेनेने वाढवून मागितलेली वेळ राज्यपालांनी नाकारल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, राज्यपालांनी सावध पवित्रा घेत तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. 
सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेने राज्यपालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळली आहे. मात्र, आता नवीन हालचाली घडताना दिसत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: We will be back by talking with Congress; NCP assured to Governor of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.