शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ लवकरच दूर होईल - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 21:18 IST

Raj Thackeray : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे.

ठाणे : अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपण सत्तेपासून आपण दूर नाही आहोत, हे मळभ लवकरच दूर होईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, "गेल्या १७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली, मनसैनिकांचे सहकार्य मिळाले, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कित्येक लोकांनी खस्ता खाल्या, कष्ट केलेत, त्यानंतर भाजपला देशभरात सत्ता मिळाली आहे. १९५२ पासून जनसंघ संघर्ष करत होता. १९५२ ते २०१४ या काळात भाजपने अनेक संकटांचा सामना केला. अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपण सत्तेपासून आपण दूर नाही आहेत. हे मळभ लवकरच दूर होईल."

याचबरोबर, जेव्हा कधी निवडणुका होऊद्यात, आपणच सत्तेत येणार आहोत. या पक्षांच्या राजकीय तमाशाला जनता कंटाळली आहे. मी भाषणं देईल, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहाचावे, असे राज ठाकरे म्हणाले. याशिवाय, माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारेही हिंदुत्ववादीच होते, भोंग्यांविरोधातील आंदोलनासाठी मनसैनिकांना तुरुंगात जावे लागले. मशिदींवरील भोंग्यांसाठी आम्ही आंदोलनं केली, पाकिस्तानी कलाकारांना आम्ही भारतातून हाकलले. मग इतर पक्षांचा हिंदुत्ववाद म्हणजे नेमका काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. याबद्दल बोलताना त्यांनी "ज्यांनी हल्ला केला त्याला आधी समजेल आणि नंतर सर्वांना समजेल, असा सणसणीत इशारा दिला. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्या मुलांचे रक्त असे वाया जाऊ देणार नाही," असे म्हणत त्यांनी पाडव्या मेळाव्यामध्ये बोलणार असल्याचेही सांगितले. यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे यांनी काही पत्रकार जाणून बुजून मनसेच्या बदनामीचा प्रचार करत असतात, असेही ते यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणेMNSमनसे