शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शून्य अपघाताच्या लक्ष्यावर पाणी!

By admin | Updated: September 7, 2015 02:42 IST

दहीहंडी उत्सव यंदा निर्बंधांमुळे चांगलाच वादात अडकला होता. हा वाद कमी करण्यासाठी आयोजक आणि मंडळांनी अपघात होऊ द्यायचे नाही, असे लक्ष्य ठेवले होते. पण, उत्सवादरम्यान मात्र यावर पाणी फिरले.

मुंबई : दहीहंडी उत्सव यंदा निर्बंधांमुळे चांगलाच वादात अडकला होता. हा वाद कमी करण्यासाठी आयोजक आणि मंडळांनी अपघात होऊ द्यायचे नाही, असे लक्ष्य ठेवले होते. पण, उत्सवादरम्यान मात्र यावर पाणी फिरले. दहीहंडी उत्सवात सायंकाळपर्यंत शहर आणि उपनगरात तब्बल १८८ गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला.उंच थरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी उत्सवाला थरांची मर्यादा घालण्यात आली होती. पण, या नियमांची पायमल्ली करून शहरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. दहीहंडीचे थर लावताना, थर उतरवताना, बाजूला उभे असताना थर कोसळल्याने, थरावर चढताना अनेक गोविंदा किरकोळ जखमी झाले. त्यातील जवळपास १९ गोविंदा गंभीर जखमी झाले. काहींना डोक्याला मार लागला असून, काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. पण, सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर आहे. तर, १६९ गोविंदांना आपत्कालीन विभागात प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले. 16उपनगरीय रुग्णालयांत ७७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ८ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केलेल्या एका गोविंदाच्या डोक्याला मार बसला आहे. उर्वरित सात गोविंदांना फ्रॅक्चर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोख बंदोबस्तरात्री श्रीकृष्ण जन्मावेळी प्रत्येक दहीहंडी पथकाच्या स्थानिक हंडीस्थळी पोलीस नजर ठेवून होते; तर रविवारी सकाळपासून शहरात सर्वच ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केलेल्या जागी पोलिसांचा फौजफाटा दिसून आला. दहीहंडीदरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या बाईकस्वारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला होता. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ८२0 केसेस दाखल करण्यात आल्याचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी सांगितले. संध्याकाळी ४ ते संध्याकाळी ६पर्यंत सर्वाधिक कारवाई झाली असून, तब्बल २0५ केसेस झाल्याचे भारांबे म्हणाले. तर संध्याकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत १७८ केसेस ट्रिपल सीटच्या दाखल झाल्या आहेत. ट्रकवर लटकून प्रवास करणाऱ्या ६0 केसेसही दाखल करण्यात आल्या असून, या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र या केसेस करण्यात येत असल्या तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात होते. नायर रुग्णालय ११ गोविंदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. १७ वर्षाच्या गोविंदाचे उजव्या हाताचे कोपर फॅ्रक्चर झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. केईएम रुग्णालय केईएम रुग्णालयात सायंकाळपर्यंत ५८ गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी ६ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ जणांना आॅर्थाेपेडिक्स विभागात तर एकाला सर्जरी विभागात दाखल करण्यात आले आहे. सायन रुग्णालय सायन रुग्णालयात एकूण १६ गोविंदा दाखल झाले होते. त्यापैकी ६ गोविंदांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. तर १० गोविंदांच्या तपासण्या सुरू होत्या. त्यापैकी बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. जे.जे. रुग्णालय समूहजे.जे. रुग्णालयात ६, जी.टी. रुग्णालयात ६ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात ८ जखमी गोविंदा उपचारासाठी आले होते. प्राथमिक उपचार देऊन सर्वांना सोडून देण्यात आले.